या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'भूक लागलीय.'
 'इतक्या रात्री? चला.'
 'हूं.'
 'पोहे देऊ लावून? की भाकरी टाकू ? '
 'अहं,'
 'मग?'
 ' ..................'
 गोऱ्या पोटरीवरून वर सरकणारी पावलं.
 'हे काय?'
 'तू हवीस. अगदी पूर्ण- '
 'शूऽऽ. बाहेर वन्सं आहेत.'
 'माहितेय. मुक्यानी आटोपलेले व्यवहार नकोत आता. तुझं कातीव रूप. मिटलेल्या डोळ्यांतून सळसळणारी गोड वेदना. दुखऱ्या ओठांतून झिरपणारे सीत्कार. सारं उजेडात निरखायचंय मला.'
 खूप भूक लागलीय.

* * *

 घोषा.
 रानावनात भटकणारी. वैराण मनं. वर पांढरं आभाळ. पांढरे ढग वांझ असतात.
 ...तर घोषा रानात उगाचच भेटकतेय. अंगभर उतलेलं पांढरं कोड वागवीत नुस्तं भटकायचं.
 तर, तिला एकदा दोन पानं सापडली. कोवळी नी रसरशीत. इतकी ताजी की सहज तोंडात टाकावीत. घोंषानं तेच

स्वरांत/११