पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

खिस्ताने या वचनाच्या द्वारे सांगितले आहे. निस्ताच्या वचनाचा सरळ अर्थ हाच आहे. स्वताच्या स्वार्थबुद्धीला पटेल असा अर्थ निर्माण करण्याकरितांच मूळ संहितेची ओढाताण करणे युक्त नाही. सत्य जसें असेल तसेच घेतले पाहिजे. त्याला विकृत करण्याचे कर्म केव्हाही करूं नका. यहुदी लोकांकरितां हे वचन असून आपल्या यहुदी श्रोत्यांपुढेच हे वचन खिस्त बोलला असा या वचनाचा अर्थ कोणी कोणी करीत असल्याचे मला माहीत आहे. संहितांचे अर्थ आपण अशा रीतीने करूं लागलों तर वाटेल त्या वचनांतून वाटेल तो अर्थ निर्माण करणे अशक्य नाही. पण अशा रीतीने संहिता विकृत करणे अयोग्य आहे. सत्य जसें असेल तसेच त्याचे ग्रहण करण्या इतकें धैर्य आपल्या चित्ताला पाहिजे. आज त्याप्रमाणे तंतोतंत वागण्यास लागणारे धैर्य आपणापाशी नसेल; पण तसे असले तरी निदान सत्याचे ग्रहण शुद्ध बुद्धीनें करण्याइतका प्रांजलपणा तरी अवश्य पाहिजे. आज त्याप्रमाणे वागण्याची छाती आम्हांस नाही अशी स्पष्ट कबुली देणे हे शतपट चांगले. कारण त्यामुळे मूलतत्त्वाचा उच्छेद तरी होत नाही. आपल्या ध्येयाला अनुरूप अशी वर्तणूक करण्याचे धैर्य नाही म्हणून ध्येयाचे स्वरूप विकृत करून त्याला पदभ्रष्ट करावयाचे आणि अशा रीतीने आपल्या वर्तणुकीशी त्याला सुसंगत करावयाचे हा दांभिकपणाचा कळस आहे. अशी संवय ज्याच्या चित्ताला लागली त्याला भविष्यत् काळाची आशाही उरलेली नाही. तर अशा फसगतींत न पडतां आपल्या ध्येयाकडे पोहोचण्याची खटपट आपण करीत राहिलों तर आज ना उद्या तेथे पोहोचण्याची आशा तरी आहे. आपले सर्वस्व गरिबांना अर्पण कर हे सांगण्यांत समतेच्या तत्त्वाचेंच प्रतिपादन खिस्तानें केलें आहे. संपत्तीच्या आधिक्यामुळे वेगळेपणा येतो आणि त्यातून पुढे हक्क सांगण्याची बुद्धि निर्माण होते. ही बुद्धि ज्या ज्या कारणांनी निर्माण होण्याचा संभव असतो, त्या त्या कारणांच्या मुळाशीच कुऱ्हाड घालण्याचा यत्न खिस्ताने केला आहे. याकरिता त्याचा खरा भावार्थ लक्ष्यांत आणून त्याचे अनुसंधान वर्तणुकीत राखण्याचा यत्न आपण केला पाहिजे. समतेचे तत्त्व चित्तांत बाणेल आणि चालू व्यवहारांत उतरेल अशारीतीने वागणे हेच आपले कर्तव्य आहे. हे साध्य होण्याकरिता जे जे काही करावे लागेल तें तें अवश्य केलें पाहिजे. ज्या ज्ञानाच्या योगाने ही साम्यावस्था प्राप्त होते तें ज्ञान संपादन