पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] हक्क. १११

साम्य उत्पन्न होण्याकरितां आपण केलेल्या अनेक खटपटींचे अत्युच्च फळ म्हटलें म्हणजे विशेष हक्क नाहीसे करणे हे होय; आणि इतके मात्र आपणास करता येण्यासारखे आहे. आपणापुढे जे काही कार्य आज आहे तें हैंच. हे सिद्ध होण्याकरिता एखाद्या व्यक्तीने अथवा एखाद्या राष्ट्रानेच नव्हे, तर साऱ्या जगानें खटपट केली पाहिजे. जगांतील साऱ्या समाजांत हे युद्ध चालू आहे. या लढाईपासून मुक्त असा एकही समाज अथवा एकही मानववंश पूर्वी अस्तित्वात नव्हता आणि सांप्रतही नाही. समाजांतील एखादा व्यक्तिसमूह बाकीच्या व्यक्तींहून बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असेल; पण एवढयाकरितां बाकीच्या समाजांतील साऱ्या घटकांचे शारीरस्वास्थ्यसुद्धा त्याने हिरावून घ्यावें हा कोठला न्याय ? एक दुसऱ्याहून अधिक बुद्धिमान् आहे हेच या अनर्थाचें मूळ नव्हे; तर आपल्या बुद्धीच्या जोरावर दुसऱ्यांच्या शारीरसुखाच्याही आड तो येऊ लागतो हीच मोठी अडचणीची गोष्ट आहे. ज्याला बुद्धि नाही त्याला बौद्धिक आनंदाची प्राप्ति अर्थातच नाहीं; आणि शारीरिक आनंद त्याला मिळावा हे योग्य असतां त्यालाही तो मुकतो. केवळ उच्चेतर बुद्धीमुळे उत्पन्न होणाऱ्या हक्कांचा नाश करण्यासाठी या उभयपक्षांत रणे माजू लागतात. त्याच प्रमाणे जे कित्येक शरिराने वरिष्ठ असतात ते दुबळ्यांच्या सुखाच्या आड येतात; आणि असे का ह्मणून विचारले तर ' बळी तो कान पिळी ' हा न्यायच आहे असें ह्मणूं लागतात. मग या दोन पक्षांत युद्धास सुरवात होते. केवळ शारीरिक बळ अधिक म्हणून दुसऱ्याच्या सुखाच्या आड येणे ही गोष्ट नीतिनिर्बधांस सोडून आहे, आणि यामुळेच दोन पक्षांत युद्धास सुरवात होते. दुसरे कित्येक लोक जन्मतःच द्रव्यदृष्टि असतात. पैशाचे दोन पैसे कसे करावे ही अक्कल इतरांहून त्यांस अधिक असते. एखाद्याच्या अंगी असा गुण असणे स्वाभाविक आहे; पण जवळ चार पैसे अधिक होण्याबरोबर इतर गोरगरिबांस खुशाल तुडविण्याचा हक्क त्यास प्राप्त होतो काय ? हे कर्म नीतीला सोडून असल्यामुळेच श्रीमंत आणि गरीब यांच्यांतील तेढ सांप्रतविकोपास जाऊ पाहत आहे. आपल्या अंगांतील विशेष गुणांचा उपयोग दुसऱ्याला नाडण्याकडे करणे हेच विशिष्ट हक्काचे रूप होय; आणि मानव 'जातीचा इतिहास युगांतरापासून पाहिला तरी प्रत्येक समाजांत असले राक्षसी हक्क नष्ट करण्याकडेच जनसमूहाची प्रवृत्ति आहे असे दिसून येईल. नीति-