पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ नवम


प्रकारांनी प्रकट होते, त्या शक्तीच्या मूलरूपास प्राण अशी संज्ञा आहे. जगांत जितक्या प्रकारच्या गती आपल्या अवलोकनांत येतात, तितक्या साऱ्यांचा उगम प्राणापासूनच झाला आहे. प्राणशक्तीनेच इतकी अनेकविध रूपे घेतली आहेत. प्राणाचे स्वरूप विद्युत् आणि चुंबकाकर्षण यांजसारखें आहे. हीच प्राणशक्ति विचाररूपाने मेंदूंतून बाहेर पडते. विश्वांत प्राणाचें वास्तव्य सर्वत्र आहे किंबहुना सर्व प्राणमयच आहे. सूर्य, चंद्र आणि तारे यांस गति देण्याचे कार्य प्राणशक्ति करीत आहे.
 या सा-या विश्वांत जितकें दृश्यजात आहे तितकें सारें प्राणशक्तीच्या स्पंदांमुळे व्यक्तदशेस आले आहे असें योग्यांचे म्हणणे आहे. प्राणस्पंदांचें वरिष्ठ कार्य विचार हे आहे. याहून अधिक महत्वाचे असे एखादें कार्य असेल तर त्याचा शोध मनुष्यास अद्यापि लागलेला नाही. याहून वरचढ अशा एखाद्या कार्याची कल्पनासुद्धां आम्हांस करता येत नाही. इडा आणि पिंगला या नाड्यांचे कार्य प्राणाच्या द्वारे चालते. शरिराच्या प्रत्येक भागाची हाल- चाल प्राणामुळे होते; आणि ही हालचाल करतांना ही एकच प्राणशक्ति अनेक रूपें धारण करीत असते. परमेश्वर या साऱ्या क्रिया करवीत असतो ही जुनी कल्पना तुम्ही आता सोडून द्या. तो विश्वाच्या बाहेर कोठे वसत नाही, आणि तेथून न्याय देण्याचे कामही करीत नाही. प्राणायामामुळे श्वासोच्छ्वासाची क्रिया सुरळीत चालते. श्वासोच्छवास हे प्राणशक्तीचे एक दृश्य रूप आहे. प्राणशक्तीचे प्रकटीकरण समतोलपणे होत आहे की नाही हे जाणण्याचे एक साधन श्वासोच्छवास हे आहे. प्राणशक्तीचे प्रकटीकरण सम- तोलपणे होत असले म्हाणजे शरिरांतील यच्चयावत् क्रिया सुरळीत चालतात. प्राणायामाने सारे शरीर योग्यांच्या ताब्यांत आले म्हणजे शरिरांतील कोण- त्याही भागांत काही रोग झाला म्हणजे प्राणशक्तीचें आविष्करण त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही असे ते जाणतात आणि प्राणाचा संयम त्या विशिष्ट जागी करून ते रोगमुक्त होतात.
 आपल्या देहांतील प्राणशक्तीवर ज्याप्रमाणे तुम्हांस ताबा चालवितां येतो, त्याप्रमाणे तेवढे सामर्थ्य तुम्हांस प्राप्त झाले तर येथून हिंदुस्थानां- तल्या एखाद्या माणसाच्या प्राणशक्तीवरही तुम्हांस ताबा चालविता येईल. प्राणशक्ति कोठेही झाली तरी एकाच स्वरूपाची आहे. प्राणशक्तीचा वास