पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[नवम


.

व्यक्तदशेला आले आहे तो परिपूर्ण करण्याला लागणारी साधनें त्यांत आहेत. त्याचे अस्तित्व हेतुपूर्तीपुरतें मात्र आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. त्याचे अस्तित्व देशकालकारणादि उपाधिरहित जे अस्तित्व आहे त्यावर अव- लंबून आहे.
 असो. मूळ रस्ता सोडून आपण बरेच बाजूला आलो. आता हे विषयांतर येथेच सोडून आपल्या उद्दिष्ट विषयाकडे आपण वळू.
 आपल्या हस्तपादादि अवयवांनी ज्या क्रिया आपण जाणून बुजून करतो त्या अथवा हृदयाच्या उडण्यासारख्या ज्या आपल्या जाणिवेंत येत नाहीत त्या क्रिया प्राणशक्ति ज्ञानतंतूंच्या द्वारे करीत असते. आपल्या शरिरांत कित्येक क्रिया अशा प्रकारच्या घडत असतात की त्यांवर आपणास ताबा चालवितां येत नाही. उदाहरणार्थ, हृदयाची क्रिया. हृदयाचे उडणे आपणास वाटेल तेव्हां बंद करता येत नाही. आपली नाडी आणि आपल्या दुसऱ्या धमन्या उडण्याचे आपणास बंद करता येत नाही. आपल्या देहांत या क्रिया घडतात कशा हे आपल्या जाणिवेतही येत नाही. आपल्या समजुतींत न येतां त्या चालत असतात. अशा क्रिया आपणास आपल्या ताव्यांत आणता आल्या तर खरोखर मोठी गंमत होईल.
 परमेश्वर ह्मणजे काय आणि मनुष्यप्राणी ह्मणजे काय याच्या व्याख्या दुसऱ्या एका प्रसंगी मी आपणांस सांगितल्या होत्या. मनुष्य ह्मणजे व्यास- रहित अखंड चक्रासारखा असून त्याचा मध्यबिंदु एकाच ठिकाणी आहे; आणि परमेश्वर ह्मणजे व्यासरहित चक्र असून त्याला मध्यबिंदु नाहीं असें ठिकाणच नाही. एकाचा मध्यबिंदु एकाच स्थानी असून दुसऱ्याचा सर्व व्यापी आहे. मनुष्याच्या क्रिया दोनच हातांनी चालतात. परमेश्वर अनंतहस्तांनी कार्य करीत असतो. मनुष्याला दोनच डोळे असतात. परमेश्वर अनंत डोळ्यांनी पाहतो. मनुष्य दोनच पायांनी चालतो. परमेश्वर अनंत पायांनी चालत असतो. मनुष्य एकाच देहांत आपली जीवितयात्रा कमीत असतो. परमेश्वराची वस्ती अनंत देहांत आहे. मनुष्य आणि परमेश्वर यांत असा फरक दिसत आहे; तथापि मनुष्यालाही सर्वव्यापी होण्याचे सामर्थ्य आहे. 'नर करनी करे तो नरका नारायण होत.' मनुष्याला परमेश्वर होतां येते आणि सर्व विश्वावर ताबा चालवितां येतो. त्याच्या जाणिवेचा मध्यबिंदु सध्या एकाच