पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


चाल अथवा असे एखादें मत प्रतिपादन करण्याचा प्रसंग त्याच्या पुरस्कर्त्यास येतो, तेव्हां या नष्ट झालेल्या शाखा त्याच्या उपयोगी पडत असतात. तुमचे मत वेदबाह्य आहे असे त्याला कोणी म्हटले, की त्याला आधार या नष्ट श्रुतीत होता असे उत्तर तो बिनदिक्कत देतो. आपल्या अशास्त्र मताचें सम- र्थन अशा रीतीने करणे हीसुद्धा एक चालच होऊन बसली आहे. अशा रीतीने या नष्ट शाखा अनेक चालीरितींचे मोठे आश्रयस्थान होऊन बसलें आहे. श्रुतींच्या अर्थांसंबंधीही मोठ्या कडाक्याचे वाद चालू असतात, आणि त्यांतून वेगवेगळा अर्थ काढण्याची धडपड प्रत्येक पक्ष करीत असतो. यामुळे त्याच्या अंतर्गत रहस्याचा धागा ध्यानी येणे मोठे दुरापास्त होऊन बसतें. श्रुतिग्रंथ पुष्कळ असले तरी ते खरोखर विस्कळित नाहीत. त्यांच्यांत पर- स्पर संबंध कांहींच नाही, असें नाही. बाह्यतः विविध म्हणून दिसणाऱ्या ह्या ग्रंथांच्या पोटी एकतानता असली पाहिजे, ही खूण आपल्या अंतर्यामी आप- णास पटल्याशिवाय राहत नाही. या सान्यांचा पाया एकच असला पाहिजे. बाह्यतः अगदी विसंगत दिसणारा हा सारस्वतसमूह कोणत्या तरी एखाद्या मुख्य मुद्यावर एकरूप आणि सुसंगत होत असला पाहिजे. याच मूळ पायाला आम्ही आमचा धर्म असें म्हणतो. आमचा धर्म दिसतो तितका खरोखरच विसंगत आणि विस्कळित असता तर कालचक्राच्या तडाक्यांत तो कधीच नाहीसा होऊन गेला असता. आज हजारों वर्षे अनेक प्रकारच्या आपत्ति आणि प्रतिकूल परिस्थिति भोगीत असतांही तो जिवंत आणि ताजातवाना आहे, या एकाच गोष्टीवरून त्याचा अंतर्गत जिवटपणा आणि त्याची अभेद्य घटना यांचा अजमास सहज करता येतो.
 आतां आमच्या टीकाकार पंडितांकडे पाहिले म्हणजे आणखीही एक अ- डचण दिसू लागते. एखादा अद्वैतवादी श्रुतिग्रंथांचा अर्थ लावू लागला म्हणजे आपल्या मताला अनुकूल असें वचन आढळेल तें जसेच्या तसेच ठेवतो; पण त्यांत एखादं वचन द्वैताला पुष्टि देणारे आढळले, की त्याची विलक्षण ओढाताण आणि चिरफाड करून त्यांतून विचित्र अर्थ तो निर्माण करतो. तुमच्या स्वप्नींही कधी आला नसेल असला विलक्षण अर्थ तो तुम्हांपुढे मां- डतो. 'अज' म्हणजे जन्मास न आलेला असा सरळ अर्थ संदर्भानुरूप लागत असला, तरी तो स्वमताविरुद्ध जात असल्यास 'येथें अज म्हणजे बकरा