पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


प्रत्येक शब्दाने तुमच्या चित्तावर ठसवीत आहेत ! उपनिषदांसंबंधी सर्वांत मोठा आणि नित्य लक्ष्यात ठेवण्याचा मुद्दा तो हाच. काही झाले तरी हीन- बल होऊ नका असा उपदेश अखिल मानवजातीला ती उच्च दोषाने करीत आहेत. माझ्या साऱ्या आयुष्यांत जर कोणता अत्यंत महत्वाचा धडा मी शिकलो असेन तर तो हाच. 'नायमात्मा बलहीनेन लभ्यः ।' हेच तत्त्व सर्व उपनिषदें आपणांस मुख्यत्वेकरून सांगत आहेत.
 मनुष्यप्राणी म्हटला की त्याच्या ठिकाणी दौर्बल्य हे असावयाचेंच, असा आपला अनुभव आहे; आणि ही गोष्ट उपनिषदांनीही कबूल केली आहे. यासाठीच त्यांचा उपदेश असा आहे की दौर्बल्य वाढविणाऱ्या अशा कोण- त्याही गोष्टी करूं नका. अधिक घाण केल्याने पहिली घाण नाहीशी होते असें नाही. पापाने पाप धुतले जात नाही, आणि दौर्बल्याने दौर्बल्य नाहींसें होत नाही. बलवान् होण्यानेच दौर्बल्य नाहीसे होईल. याकरिता बलवान् होण्याचा यत्न करा. जागे व्हा, बलवान् व्हा, असा उपनिषदांचा उपदेश आहे. 'निर्भय व्हा' असा उपदेश सा-या जगांतल्या वाङ्मयांत तुम्हांस फक्त येथेच आढळतो. हा उपदेश उपनिषदांनी वारंवार केला आहे. 'निर्भय' हे गुणदर्शक विशेषण परमेश्वरामागे अथवा मनुष्यामागे लावण्याचे उदाहरण जगांतील दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयांत तुम्हांस आढळावयाचे नाही. महा- प्रतापी बादशहा शिकंदर याची आठवण या प्रसंगी मला होते. सिंधुनदीच्या कांठी असलेल्या एका अरण्यांत एक दिगंबर संन्यासी एका शिलातलावर बसला असतां त्याजपुढे उभा राहून शिकंदर बादशहा त्याला द्रव्याचा लोभ दाख- वीत आहे असे चित्र या प्रसंगी माझ्या मनश्चक्षूंपुढे उभे राहते. त्या अव धूत संन्याशाचे ज्ञान पाहून बादशहा चकित होऊन क्षणभर अगदी स्तब्ध झाला. संन्याशाने आपणाबरोबर ग्रीस देशास यावें. अशी बादशहाची फार इच्छा होती. बादशहाच्या सुवर्णाच्या देखाव्याने संन्यासी मोह पावला नाही. त्याच्या मानमरातबांनी संन्याशाचे चित्त किंचितही कंप पावलें नाहीं. मानपान आणि सुवर्ण हे पदार्थ तुच्छ आहेत असा भाव संन्याशाने दर्शविला. हा आपला मोठा अपमान झाला असे वाटून बादशहा क्रोधायमान झाला. आपण पृथ्वीपति आणि हा कंगाल हा फरक बादशहाच्या चित्ताला या वेळी विशेष जाणवला. तो म्हणाला, तूं मजबरोबर न येशील तर तुला ठार