पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १७९


करण्याचे सामर्थ्य मजमध्ये आहे." बादशहाचे हे भाषण ऐकून संन्याशी खदखदा हसून म्हणाला, “राजा, असे खोटें कां बोलतोस? मला मारण्याचे सामर्थ्य तुलाच काय, पण दुसऱ्याही कोणाला नाही. तूं जड जगाचा धनी आहेस. मला चैतन्यरूपाला तूं काय करू शकणार आहेस? तूं मला मारूं शकशील ही गोष्ट कालत्रयांत घडावयाची नाहीं; कारण, मी अजन्मा आहे. मी चैतन्यरूप आहे, मी अक्षय्य आहे, मी कधी जन्मत नाही आणि मर- तही नाही. मी अनंत आणि सर्वव्यापी आहे, आणि मी सर्वसाक्षीही आहे. बच्चा, तूं मला मारू शकशील काय?" विशाल सामर्थ्य म्हणतात तें हेंच. माझ्या मित्रांनो, माझ्या देशबांधवांनो, उपनिषदांचा अभ्यास मी जों जों करतो तो तो त्यांचा हाच उपदेश आहे, असा माझा प्रत्यय वाढतच जातो. उपनिषदांचे जे अत्यंत व्यवहार्य तत्त्व आहे ते हेच. आम्हांला जर कोणत्या वस्तूची गरज असेल, तर ती याच मनःसामर्थ्याची आहे. अत्यंत दृढ अशा आत्मश्रद्धेचीच जरूर आपणास आहे. माझ्या देशबांधवांनो, उपनिषग्रंथ चाचीत असतां तुमची आठवण होऊन मला रडू कोसळते, आणि हे सामर्थ्य कोण देईल याचा ध्यास चित्ताला लागून राहतो. दिवसेंदिवस आपणास अधि- काधिक दुर्बल करणारे लोक मात्र आपल्याभोवती लक्षावधि आहेत. आप णास लाथ मारण्यासाठी आपला पाय जो कोणी पुढे करील, त्याच्याच पाया पाशी आपण खुशाल लोळण घेतों! मातीत लोळणाऱ्या किड्याच्या कोटीत आज आपण जाऊन बसलो आहों. आता यापेक्षा आणखी काही निराळी अधोगति म्हणून राहिली आहे काय ? दिवसेंदिवस अधिकाधिक दुर्वळ होण्या चाच यत्न जणू काय आपण गेली हजार वर्षे केला. आमची सारी पुराणे पहा. त्यांतही याच दौर्बल्य आणणान्या गोष्टी. या गोष्टींची संख्या इतकी होईल की त्यांनी पाऊण हिस्सा पुस्तकालये भरून जातील. दुर्बल कसे व्हावें हाच ध्यास जणू काय आमच्या चित्ताला या अवधीत लागून गेला होता; आणि सांप्रतची आपली अवनतावस्था हा या ध्यासाचाच परिणाम होय. माझ्या मित्रांनो, तुम्हाला जर कशाची आज जरूर असेल तर ती बलवान् चित्ताची आहे हे मी त्रिवार सांगतो. मीही तुमच्यापैकीच एक आहे. माझा जन्म तुमच्यांत झाला आणि या देहाची अखेरही तुमच्यांत असतांच व्हाव- याची आहे. जे रक्त तुमच्या धमन्यांत खेळत आहे, तेंच माझ्याही अंगांत .