पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


आशाही आजच्या स्थितीत दिसत नाही. यांच्यांतल्या प्रत्येकांत स्वार्थ भर लेला आहे; मग यांचा संघ बनणार कसा? आपापल्या स्वार्थासाठी प्रत्येकानें दुसऱ्याशी लढावें असा प्रकार आज शतकानुशतकें चालू आहे. गंध आडवें लावावें की उभे लावावें असल्या जाड्या विषयांवर कडाक्याचे वाद अजू नही चालतात ! कोणाची नजर पडली असतां अन्न विटाळते हे सिद्ध कर ण्यासाठी बैलाच्या ओझ्याचे ग्रंथ लिहिणारे बहाद्दर आजही आहेत ! गेली कित्येक शतकें आमचा धंदा म्हटला तर हाच. असल्या प्रकारचे बडे शोध लावण्यांत आणि त्याच दर्जाचे कूट प्रश्न सोडविण्यांत ज्यांच्या मेंदूची सर्व शक्ति खर्च होते असल्या नरवीरांपासून अधिक कशाची अपेक्षा आम्ही करावी? असल्या प्रकारच्या गोष्टी करण्यांत आयुष्याची इति कर्तव्यता आहे असे समजणे लाजिरवाणें नाहीं काय ? होय. असल्या प्रकाराबद्दल आम्हांस कधी कधी लाज वाटते खरी, पण ती वाटून उपयोग काय? या वस्तूंची मगरमिठी आमच्याने सोडवत नाही. आम्हांला पुष्कळ गोष्टी कराव्याशा वाटतात; पण एकही आमच्या हातून होत मात्र नाही. काही करण्याचे नुसते मनसुबे करावे आणि हाताने काहीच करूं नये अशी संवयच आम्हांस लागून गेली आहे. आपण तोंडाने काय बडबडतों याचा अर्थ पोपटाला जसा कळत नाही, त्याचप्रमाणे आम्हांलाही जणूं काय आमच्या बड- बडीचा अर्थ कळत नाही. असल्या परिस्थितीचे कारण काय ? आमचे शरीरदौर्बल्य हेच. असल्या दुबळ्या मेंदूत कर्तृत्वाची जाणीव उत्पन्नच होत नाही. याकरितां शरीरबळाकडे आपण आधी लक्ष्य दिले पाहिजे. आमच्या तरुणांनी आधी सुदृढ बनले पाहिजे. धर्म वगैरे बाकीच्या सा-या गोष्टी मग सावकाश पाहता येतील. माझ्या तरुण मित्रांनो, आधी तुम्ही सारे भीम बना. तुम्हांला माझा पहिला उपदेश हाच आहे. गीतेच्या अभ्यासापेक्षा फुटबालच्या खेळानें कैवल्यधामाचा रस्ता आम्हांस अधिक सुलभ होईल. माझे हे शब्द फाजील धाष्टांचे आहेत; पण मी तरी काय करूं ? तुमच्या- वरील माझें प्रेम हे शब्द माझ्या तोंडून वदवितें. गीतेचा खरा अर्थ तुमच्या मनगटाची रुंद कांब तुम्हांस अधिक चांगला समजावून देईल. तुमचे दंड पिळदार होऊन भरपूर रक्त तुमच्या नाड्यातून सळसळू लागले म्हणजे भग वान् श्रीकृष्णाच्या प्रचंड शक्तीची आणि अगाध बुद्धिमत्तेची खरी साक्ष