पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


भावजन्य आणि समाजाच्या वाढीला पोषक आहे. समाजरचनेतील घोटाळे नाहींसे करून त्याला व्यवस्थित रूप देण्याचे कार्य जातिभेद करतो. समा- जाची घटना सुयंत्रित चालण्याचे अगदी स्वभावसिद्ध साधन जातिमेद हेच आहे. याशिवाय इतके सोपें दुसरें साधन आपणास उपलब्ध नाही. काही झालें तरी लहान लहान जमाव करून राहणे ही मनुष्याची उपजत बुद्धि आहे आणि ती नाहीशी करणे तुम्हांस कधीच शक्य नाही. पण असे असले तरी काही जातींस त्यामुळे विशिष्ट हक्क प्राप्त होतात असा अर्थ नाही. असे हक्क प्राप्त होणे ही स्वभावसिद्ध घटना नव्हे; ती कृत्रिम रचना आहे. या- करितां असल्या हक्कांचा कपाळमोक्षच केला पाहिजे. कोळ्याला तुम्ही वेद पढविले तर सर्वांचे मनुष्यत्व एकाच योग्यतेचे आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावांचून राहणार नाही. एक मासेविक्या असला आणि दुसरा मोठा तत्त्ववेत्ता झाला तरी दोघांतील मनुष्यत्वाचा सामान्य धर्म एकच आहे असे तो म्हणूं लागेल. दोघांच्याही ठिकाणी एकाच परमात्म्याचा वास आहे असें तो सांगेल. असे झाले म्हणजे सांप्रतचे विशिष्ट हक्क आपोआपच संपु ष्टांत येतील. असे होणे हे आपणांस इष्टच आहे. कारण त्यामुळे सर्वांस सार खीच संधि मिळेल. सर्वांच्या अंतर्यामी एकाच परमेश्वराचा वास आहे ही गोष्ट सर्वांस पटली म्हणजे प्रत्येकजण आपापल्यापरी आपल्या उन्नतीचा मार्ग शोधून काढील.
 स्वतंत्रतेशिवाय वाढ नाही. पूर्ण स्वातंत्र्यावांचून कोणत्याही वस्तूची वाढ होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूची उत्क्रांति अंतरंगांतूनच व्हावयास पाहिजे. कोणी कोणाची वाढ करूं शकत नाही. मी अमक्या एकाची वाढ करीन असें कोणासही म्हणतां यावयाचे नाही. एकाने दिली आणि दुसऱ्याने घेतली अशी ही वस्तूच नव्हे. "आत्मैवह्यात्मनो बंधुः" हा सिद्धांत प्रत्येकानें ध्यानात ठेवला पाहिजे. प्रत्येक स्त्रीची, पुरुषाची आणि मुलाची उन्नति ज्याची त्याजवर अवलंबून आहे. विधवांची स्थिति आणि सामान्यतः स्त्रीवर्गाची उन्नति यांजबद्दल अनेकवार अनेक प्रकारचे प्रश्न लोक मला विचारीत असतात. या बाबतीत माझें मत काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा पुष्कळांस दिसते. याकरितां याचे उत्तर एकदाचे देऊन टाकावें हें बरें. लोकांच्या या प्रश्नावर उत्तरादाखल मी उलट एक प्रश्न असा विचारतों की