पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त. २५३


 अशा प्रकारच्या या प्राचीन भूमीत मी तुम्हांसमोर आज उभा आहे. मोठा तत्त्वदर्शी अथवा गुरु म्हणून मी येथे आलों नाही. कारण गुरु होण्याइतकें ज्ञान मजपाशीं नाही. पाश्चात्य भागांतील आपल्या बांधवांस भेटून सुखदुः खाचे चार शब्द त्यांजपाशी बोलावे, इतक्याच हेतूने मी येथें आलो आहे. आपणां दोघांत भेद कोठे आहे हे पाहण्याकरितां नव्हे, तर कोणत्या मुद्या वर आपणांत एकवाक्यता आहे, हे पाहण्याकरितां मी आलो आहे. कोणत्या भूमिकेवर आपणांतील एकी कायम टिकेल हे जाणण्यासाठी मी आलो आहे. प्राचीनतम काळापासून ज्या तत्त्वांचा उच्च घोष आपल्या भूमीत झाला आहे, त्यांच्या पायावर आपली एकी दृढतर कशी होईल, हे जाणण्यासाठी मी येथे आलो आहे. परस्परांतील भेद वाढवून विनाशाची बीजे पेरण्याकरितां नव्हे, तर आपणां दोघांसहि एकजुटीने कोणतें विधायक कार्य करितां येईल, हे जाणण्या साठी मी येथे आलो आहे. परस्परांनी परस्परांवर टीका करण्याचे दिवस आतां संपले. आता सर्वांचे एकमत कोठे होते, एवढेच पाहून एखादें संघटित कार्य करण्याची वेळ आली आहे. काही प्रसंगी अत्यंत कडक टीकेचीहि जरूर जगाला असते. पण अशी वेळ दीर्घ काळ टिंकणारी नव्हे. विशिष्ट प्रसंगापुर तीच ती असते; आणि प्रसंगाच्या समाप्तीबरोबर ही टीकेचेहि प्रवृत्ति समाप्त झाली पाहिजे. त्यानंतर चिरकाल टिकणाऱ्या सुसंघटित कार्यास सुरवात झाली पाहिजे. आपलें पाऊल पुढे पडघ्यास टीकेचा आणि विनाशक कार्याचा उप योग होत नसून, परस्परमदतीचा आणि विधायक प्रवृत्तीचाच उपयोग होत असतो. गेली शंभर वर्षे आपल्या या भूमीत टीकेचा पूर वहात होता. पाश्चात्य भौतिक शास्त्रांचा उज्ज्वल दीप झगझगीत पेटून त्याचा प्रकाश साऱ्या अंधाऱ्या जाग्यावर पडला. अगदी कोनेकोपरे आणि बिळेंसुद्धां लपून राहिली नाहीत; एवढेच नव्हे तर प्रकाशाच्या तीव्रतेने ती अधिकच स्पष्ट दिसू लागली. इतर चांगल्या वस्तू त्यामुळे मागे पडल्या. अशा स्थितीत मोठे मोठे बुद्धिमान् पुरुष जन्मास आले. सत्य आणि न्याय यांजबद्दल पूर्ण भक्ति त्यांच्या चित्तांत होती. स्वदेशाबद्दल त्यांच्या मनांत अत्यंत प्रेम होते, आणि विशेष हे की, ईश्वर आणि आपला धर्म यांजबद्दल त्यांच्या अंतःकरणांत भक्ति होती. या उत्कट भक्तीमुळेच आपल्या धर्मात आणि समाजरचनेत जी व्यंगें म्हणून त्यांना वाटली, त्यांजवर टीकेचा भडिमार त्यांनी उडवून दिला. अंत-