पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम.

*****

सभ्य स्त्रीपुरुषहो! आशियाच्या पूर्वभागांतून मी प्रवास करीत असतां एक गोष्ट विशेषेकरून माझ्या ध्यानात आली. पूर्व आशियातील देशांत हिंदुतत्त्वज्ञानाचा प्रसार सर्वत्र झाला असल्याचे मला आढळून आले. चिनी आणि जपानी देवळांच्या भिंतींवर काहीं सुप्रसिद्ध संस्कृत मंत्र मी पाहिले, तेव्हा मला किती नवल वाटले असेल, याची कल्पना तुम्हीच करा. विशेषतः हे मंत्र जुन्या बंगाली लिपीत लिहिलेले आहेत, हे ऐकून तुम्हांला थोडाबहुत आनंदही होईल. स्व धर्माचा प्रसार करण्याकरिता आमचे पूर्वज केवढ्या उत्साहाने आणि मनो भावाने यत्न करीत, याची ढळढळीत साक्ष हे लेख आज देत आहेत.
 आशियांतील देश वगळले तर पाश्चात्य देशांतहि आमच्या तत्त्वविचारांचा प्रसार इतक्या विस्तृत प्रमाणावर आणि इतक्या स्पष्ट रीतीने झाला आहे की, त्यांची छटा त्या देशांत अद्यापिही मला आढळून येते. मात्र ही गोष्ट लक्षात येण्यास आपली मजल थोडी अधिक तीव्र करून पाश्चात्य समा जाच्या बुडापर्यंत ती पोंचविली पाहिजे. आमच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार अत्यंत प्राचीन काळी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही देशांकडे झाला होता ही गोष्ट आतां इतिहासप्रसिद्ध आहे. हिंदु धर्माचे ऋण एकंदर जगावर किती आहे, हे आता सर्वांना ठाऊक झाले आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानांतील तत्त्वविचा रांचा पगडा प्राचीन आणि अर्वाचीन समाजावर किती पडला होता आणि त्याने काय कार्य केलें हेहि सर्वांस ठाऊक आहे. या प्राचीनकाळच्या गोष्टी झाल्या. सांप्रतकाळी अँग्लोसाक्सन वंशाने समाजरचनेंत आघाडी मारून संस्कृतीच्या मार्गात मनुष्याचे पाऊल पुढे पडण्यांत फार मोठे कार्य केलें आहे, ही गोष्ट तिकडे प्रवास करीत असतां माझ्या लक्षात आली. फार काय, पण या वंशाने केलेले कार्य घडून आले नसते, तर आज जशा प्रकारें या गोष्टींची चर्चा आपण करीत आहों, तसे करण्याची सवड आपणांस मिळाली नसती असेंही मी म्हणेन. पाश्चात्य देशांतला प्रवास पुरा करून मी पूर्वेकडे