पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी. २७

सर्व तोंडांच्या द्वारे भक्षणाची क्रिया तुम्हीच करतां. सर्व हातांच्या द्वारे अनेक क्रिया तुम्ही संपादन करतां, आणि सर्व नेत्रांच्या द्वारे पाहणारेही तुम्हीच. कोट्यवधी शरिरांच्या द्वारें चैन भोगणारे तुम्हीच आणि कोट्यवधी दुसऱ्या शरिरांच्या द्वारें अनेक भयंकर रोगांची दुःखें भोगणारेहि तुम्हीच. या ' सिद्धांताचा उदय आपल्या अंतःकरणांत होऊन त्याचा अनुभव आपणासः आला व आपल्या सर्व जीवनांत तो खेळू लागला म्हणजे आपली सारी दुःखें लयास जातील, आणि त्या दुःखांबरोबर आपली भीतीही नष्ट होईल. मला मरण कोठचें ? कारण माझ्यापलीकडचें असें अस्तित्वच नाहीं; मग मरून मी जाणार तरी कोठे ? सर्व प्रकारच्या भयाचा लय झाला म्हणजेच पूर्णानंदाची प्राप्ति होते. त्याचप्रमाणे पूर्ण प्रेमाची प्रवृत्ति भयाच्या निवृत्तीनंतर उत्पन्न होते. विश्वव्यापी सहानुकंपा, विश्वव्यापी प्रेम आणि विश्वव्यापी आनंद यांच्यायोगाने मनुष्य सर्व अवस्थांतराच्या पलीकडे जातो. कोणतीही परिस्थिति त्याला बाधा करू शकत नाही. ' यद्गत्वा न निवर्तते तद्धामः परमं मम ' । असें धाम ते हेच. अशा स्थितीत क्रिया प्रतिक्रिया नाहीत, आणि तदद्वारा प्राप्त होणारे दुःखही तेथें नाहीं. लौकिक स्थितीतील सर्व क्रियांस प्रतिक्रिया अवश्यपणे घडतात. कसलीही क्रिया म्हटली की तेथे प्रतिक्रिया आलीच. किंबहुना, क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजेच जीवित आणि या क्रियाप्रतिक्रियांचे आदिकारण द्वैतबुद्धि हेच आहे. या विश्वापासून मी भिन्न आहे आणि परमात्म्यापासूनही मी भिन्न आहे असे वाटणे याचे नांव द्वैत. पण ' सोऽहं । विश्वात्मा मीच आहे ' या निश्चयापर्यंत मी पोहोंचलों म्हणजे सच्चिदानंदपदी मी आरूढ होतो; मी कैवल्यधामाला पोहोंचतों आणि मी कायमचा मुक्त होतो. असे झाले म्हणजे पूर्ण प्रेमाची प्राप्ति मला होते आणि सर्व भीति आणि दुःखें ही बरोबरच विलयास जातात.

याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी.

 आकाशांत ढग पुष्कळ येऊन सूर्यप्रकाश अंधुक झाला म्हणजे त्या दिवसाला दुर्दिन असे म्हणण्याची चाल आहे; पण ज्या दिवशी हरिनाम कानीं पडणार नाही तोच दिवस खरोखर दुर्दिन होय. अभ्रमय दिवस हा कांहीं