पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/24

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलन प्रचारांत केव्हां आलें ?

ऐवजी नऊ रुपये होईल, उलटपक्षी उद्योगधंदा खालावल्यामुळे लोकां- जवळील पैसा पूर्वीपेक्षा कमी झाल्यास जारी खरेदी करण्यास पूर्वी सोळा लक्ष रुपये होते त्याचे ऐवजी आतां १४ च लक्ष रुपये आहेत असें आपण समजूं व ज्वारीचा पुरवठा व तीस मागणी पूर्वीइतकीच म्हणजे दोन लक्ष मणांचीच आहे असे धरल्यास ज्वारीचा दर मणीं भाव ८ रुपयाचें ऐवजी सात रुपयांवर येईल.
 तसेंच चलन सोळा लक्ष रुपयांचेच कायम आहे, व मागणीही पूर्वी- इतकीच आहे, पण ज्वारीचा पुरवठा मात्र दोन लक्ष मणाचें ऐवजी अडीच लक्ष मण झाला, तर ज्वारीचा भाव दरमणी आठ रुपयांपेक्षां कमी होईल. उलटपक्षी ज्वारीचा पुरवठा दीड लक्ष मणच राहील, तर ज्वारीचा भाव दरमणी आठ रुपयांपेक्षां जास्त राहील. त्याचप्रमाणें चलन सोळा लक्ष रुपयांचेच आहे, पुरवठाही दोन लक्ष मणच आहे; परंतु कांहीं कारणानें मागणी मात्र दोन लक्ष मणाचें ऐवजी अडीच लक्ष मणाची झाली तर ज्वारीचा दरमणी भाव आठ रुपयापेक्षा जास्त राहील. उलटपक्षी "मागणी" दोन लक्ष मणाचे ऐवजी दीड लक्ष मणच झाली, तर ज्वारीचा भाव आउ रुपयांचे खालीं घसरेल. या उदाहरणावरून असे दिसून येईल कीं, " चलन मालाचा पुरवठा" व 66 त्यास असणारी मागणी " यांच्या कमीअधिकपणा- नुसार बाजारभावात चढउतार होतात.

" चलन प्रचारांत केव्हां आलें ? "

 मानव जातीची जसजशी प्रथमावस्थवूनें प्रगति होत चालली तसतशा . त्यांच्या गरजा नानाविध झाल्या. त्यामुळे कोणाहि एका व्यक्तीस आपल्या नानाविध गरजा भागविण्यास अवश्य असलेल्या जिनसांचे उत्पादन एकट्यासच करणें अशक्य होऊं लागलें व त्यामुळे त्यास निरनिराळ्या व्यक्तींनीं उत्पन्न केलेल्या जिनसांच्या देवघेवीवरच अवलंबून राहणे भाग पडूं लागलें, त्याकाळी आपणांस एवादी वस्तू हवी असल्यास तिच्याबद्दल, आपल्याजवळील आपणास नको, परंतु दुसन्यास हवी अशी वस्तू दुसन्यास द्यावी लागे व ती वस्तू घ्यावी लागे. अशा पद्धतीस 'ऐनजिनसी विनिमय (barter) असें