पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/31

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

लागतें; नार्णे स्वस्त झालें, कां पदार्थ महाग झाला, हें पहाणें असेल तर त्यास एकच उपाय आहे. सर्वच पदार्थ उत्पादनाच्या कमताईमुळे कधीं एकदम महाग होऊं शकत नाहींत; यंदाच्या वर्षी गहूं महाग झाले तर पुढच्या वर्षी तांदूळ महाग होतात, परंतु इतर पदार्थावी किंमत आहे तशीच राहते. पण गहूं, तांदूळ, कापड, लोखंड, कापूस वगैरे सर्वच जिन्नस एक- दम महाग झाले म्हणजे नाण्याच्या किंमतींत कांहीं फेरफार झाला आहे असें अनुमान काढण्यास कांहींच हरकत नाहीं.
 त्याचप्रमाणें धातू, अर्थात् त्या धातूचे नाणें महाग झाल्यामुळे, कां पदा- र्थांचे उत्पादन जास्त झाल्यामुळे स्वस्ताई झाली, हें पाहणे असल्यास, एखाद्या दुसन्या पदार्थाची स्वस्ताई झाल्यास तो परिणाम त्या पदार्थाच्या अधिक प्रमाणांत झालेल्या उत्पादनाचा, व सर्वच पदार्थ एकदम स्वस्त झाल्यास तो परिणाम नाणें महाग झाल्याचा होय असें समजावे.
 या ठिकाणी दुसरी अशीहि एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, नुस्तें नाणें स्वस्त झालें म्हणजे तेवढ्याने कोणताहि देश श्रीमंत अगर सुखी होत नाहीं. “पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाहीं," अशी जी आपल्या लोकांत म्हण आहे, तिची सत्यता या ठिकाणी पूर्णपणे दिसून येते. खरी श्रीमंती अगर सुख, उपभोगास लागणान्या वस्तूंच्या समृद्धीवर अव- लंबून आहे.
 एखाद्या खेडेगांवांत पाटलाची हजामत करून पावशेर ज्वारी घेऊन जाणारा न्हावी, लकेतील राक्षरेंद्राची हजामत करून मिळालेल्या सोन्याच्या चार विटांनी बाजारांत पावशेर धान्य खरेदी करणान्या न्हाव्यापेक्षां कमी सुखी आहे असे कधींहि म्हणतां येणार नाहीं. नाणे म्हणजे देवदेवीचे एक साधन आहे, तें देऊन उपभोगास लागणाऱ्या वस्तू किती प्रमाणांत मिळू शकतात, यावर माणसाची श्रीमंती अथवा गरिबी अवलंबून असते, हें वरील उदाहरणावरून दिसून येईल.
 टीप:- मुख्य चलन ( नाणें ) (Standard money).
 ज्या धातूचें तें नाणे बनविलेले असतें, ती धातू आणून दिल्यास तिच ठराविक वजनाचीं नाणी, सरकारी टांकसाळीतून पाडून मिळण्याची सवलत