पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/60

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुवर्ण चलनाच्या मार्गातील इतर अडचणी

३९

माजेल ) तसें झालें म्हणजे कठिणावस्था प्राप्त होईल, कारण जागतिक व्यापाराचे वाढीला वाब, काय तो आतां चीनमध्येच फक्त आहे. ]
 सर चार्लस एडिस बिचारे भोळे, ते मुत्सद्दी नव्हत. त्यांनी आपले सरळ सांगून टाकलें कीं " ब्रिटिशांच्या जागतिक व्यापाराच्या वाढीस आतां चीन शिवाय जगांतील दुसन्या कोणत्याहि मोठ्या देशांत वाव राहिलेला नाहीं, "तरी जेगें करून तेथील चलन पद्धतीत घोटाळा माजेल अशी कोणतीही गोष्ट हिंदुस्थानांत करूं नका. हिंदुस्थानांत सुवर्ण चलन सुरू केलेत तर आमचा चीन- मधला व्यापार बसेल. " परंतु हिल्टन यंग कमिशन पडलें मुत्सद्दी, त्यांनी हिंदुस्थानांत सुवर्णचलन सुरू केले तर चीनमधील जागतिक व्यापाराला धोका पोहोचेल, व त्याचे अनिष्ट परिणाम पुन्हां हिंदुस्थानास भोगावे लागतील असे भासवून सर चार्लस एडिस यांनी दाखविलेल्या नागड्या स्वार्थांवर जागतिक व्यापारोन्नतीचा मुलामा चढवून व हिंदुस्थानाबद्दलचे हिताची कळकळ दर्शवून सर चार्लस एडिस यांचा उद्देश सिद्धीस जाईल अशाच शिफारशी केल्या.
 येथे सुवर्ण चलन सुरू करण्याच्या मार्गीत सदर कमिशनच्या मतानें आणखी असलेल्या बन्याच अडचणी खालीलप्रमाणें होत्या:--

" सुवर्ण चलनाच्या मार्गातील इतर अडचणी "

 "सोन्याचें नाणें चालू करावयाचें म्हणजे मोठ्या खर्चाचे काम आहे, त्यास लागणारें सोने मिळावयाची मारामार पडेल. अमेरिकेत पुष्कळ सोनें आहे, परंतु तें राष्ट्र व इंग्लंडची मध्यवर्ती पेढी ह्या बाबतींत प्रतिकूल आहे; म्हणून त्यांची मदत किंवा सहानुभूति हिंदुस्थानास मिळणे अशक्य आहे. युरोपांतील राष्ट्रं महायुद्धामुळे झालेल्या आर्थिक आपत्तींतून बाहेर पडण्याची व आपापल्या चलन व्यवस्थेत सुधारणा करण्याची खटपट करीत आहेत. त्यांच्या कार्यात हिंदी सुवर्णचलनाने भयंकर व्यत्यय येऊन जगाच्या आर्थिक प्रगतीच्या गाड्यास खीळ घातल्याचे पातक हिंदुस्थानच्या माथ पडेल; हिंदुस्थाननें रुपयाचा - मुखनाणे ( Standard coin) या नात्यानें त्याग करून सोन्याच्या नाण्याचा अंगिकार केल्यास अमेरिकेतील