पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११२) एक संबंध नाही. हे दुसरे आर्य हिंदुस्थानांत प्रथमतःच नि. पू. सातव्या शतकात आले, व याच लोकांत पुढें उपनिषदादि ग्रंथ झाले, व यांच्यांतच पुढे महा- भारतीय यद्ध झाले. नामसादृश्यासंबंधाने बँडेलचे खुलासे फारच विचित्र आहेत. त्याचे म्हणणे की " एदिन हे सिंधुनदप्रांताचें नांव जसेच्या तसे सुमेरी वाङ्मयांत आढळतें व मद्दलच्या सुमेरी मद्रतहि त्याचा उल्लेख आहे. पदिन या शब्दाचाच संस्कृत उच्चार उद्यान हा आहे. व सिंधुनदान्या उत्तरेस असलेल्या हल्लीच्या स्वात या प्रांताला तें नांव असे. हा स्वात प्रातः म्हणजे पुराणांतील उशीनर राजाचा पुत्र शिबिराजा याची राज्यभूमि होय. प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने सिंधुनदाच्या खोऱ्यांत ओतिन प्रांत है, तो हाच प्रांत होय. ह्यएनत्संग म्हणतो, 'मुलतान- पासून निघाल्यावर ईशान्येकडे ७०० ली (१०० मैल) गेल्यावर पो-फा-टो देश लांगतो. येथे अशोकराजाने चार स्तूप बांधले आहेत.' ह्युएनत्संगने दाखविलेल्या दिशेला व बरोबर तितक्याच अंतरावर हल्लीचे हराप्पा गांव आहे. ह्यूएन्त्संग पुढ म्हणतो ' हा सिंतू प्रदेश सोडल्यावर नैऋत्येकडे १५००-१६०० ली (२१५- २३० मैल ) अंतरावर ओतिन् देश लागतो. त्याचा परिघ ५००० ली आहे. त्याची राजधानी खै-ति-शि-फा-लो ही आहे व तिचा परिघ ३० ली आहे. ही राज- धानी सिंतू ( सिंधु) नदीवर बसलेली आहे. राजा अशोकाने येथे ६ स्तूप बांधले आहेत.........येथून पुढे वायव्येकडे गेले असतां आपण पो-ला-सी (पशिआ ) देशाला जाऊन पोचतो.' या एकंदर वर्णनावरून त्याच्याशी तंतोतंत जुळणारे माहेंजो दारो गांव व्यक्त होतें, व हराप्पा व माहेजो-दारो या दोनहि स्थलांचा पत्ता ओतिन् म्हणजेच सुमेरी लखाणांत एदिन म्हणून उल्लेखिलेल्या प्रांतांत लागल्याने हा प्रांत निश्चित करता येतो.". वरील विवेचनावरून जर बँडेलचे म्हणणे एवढेच असते की, हिंदी व सुमेरी या उभयसंस्कृतीत नामसादृश्यादि भाषासाम्य पुष्कळ आढळून येते, व यावरून त्या दोनहि समाजांत दळणवळण पुष्कळ होते, तर त्याची उपपत्ति कदाचित् मान्य करितां आली असती; इतकेच नव्हे तर त्याला पुष्टीदाखल भाषेच्या दृष्टीने आम्हांहि त्याने न प्रति पादिलेले काही मुद्दे सुचवू. एदिन, हर्यश्व. अगइ' इत्यादि विशेष नांवांखेरीज व्याकरणदृष्ट्याहि काही साम्ये आम्ही सुचवितो. तुम् हे हेत्वर्थक तुबन्त ( Infinitive of purpose ) सुमेरी व हिंदी शिकथांतून आढळून येते. 'जिवंत करण्याला' या अर्थी जिन्-तुम् असा प्रयोग उभय चाड्मयांतील लखाणांत आढळतो. त्यांतील 'तुम्' हा प्रत्यय तर उघड उघड तुबन्त तर आहेच; पण जिन् हा शब्दहि कांहीं तरी 'जीव् ' म्हणजे जगणे अथवा जिवंत होणे या शब्दाचेंच अपवाचन असण्याचाहि संभव आहे. हा शब्दप्रयोग असलेला एक शिक्का चालू लेखाचे शेवटी दिला आहे. त्याचप्रमाणे दरेक शिक्याच्या शेवटी अस हा प्रत्यय आहे तो सुद्धा