पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ती मी सर जॉन मार्शल यांच्याच शब्दांच्या भाषांतरानें खाली देत आहे. लंडन टाइम्स् ' वर्तमानपत्राच्या फेब्रुवारीत सन १९२६ च्या अंकांतून ही माहिती Journal of Indian History या नियतकालिकाच्या Vol.V:Part I Serial No. 13 या अंकांत १०२ पृष्टावर घेतली आहे, ती येणेप्रमाणे:- "पंजाबांतील हराप्पा या ठिकाणी श्रीयुत साहनी यांनी व सिंध मधील. माहेंजो-दारो येथे श्रीयुत के. एन दीक्षित यांनी केलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या उत्खननावरून हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासावर अयंत महत्त्वाचा प्रकाश पडण्या- सारखा आहे. स्थूल मानाने रावी नदीच्या पात्राच्या ओघाने संशोधन केल्यास. किती अपूर्व साधनसंपत्ति मिळण्याचा संभव आहे, याची कल्पना या दोन ठिका- णच्या शोधांवरून येते. ___ हराप्पा येथील जागेपेक्षा माहेंजो-दारो येथील सांपडलेली जागा आकाराने लहान असली, तरी तीत अधिक वस्तुलाभ झाला आहे. आजूबाजूच्या सपाट मैदानावर सरासरी एक चौरस मैलाच्या आकाराचा व सपाटीपासून सुमारे चाळीस फूट उंचीचा एक मातीचा ढीग येथे होता. या ढिगाच्या चारी बाजूंनी चर खणले असतां त्याखाली एक उतम सुंदर बांधाचे शहर सांपडले, त्याचा काल नि. पू. ३००० वर्षे हा होय. त्याच्याहि खाली खणतांना त्यांहुन प्राचीन कालचे अव- शेष सांपडले आहेत. स्यांत सांपडलेल्या इमारतीचे साधारणतः दोन वर्ग. करतां येतात; एक मंदिरे अथवा देवालये, व दुसरा खासगी राहण्याची घरे. ती विटांची बांधलेली असून, त्यांच्या पायांत घालण्यासाठी उन्हांत तापवून बाळविलेल्या विटा वापरल्या असून भिंतींना भट्टींत भाजलेल्या विटा लावल्या आहेत. देवालये उच्च चौथन्यावर बांधलेली असून त्यांचे गाभारे लहान असून भिंती फार जाड आहेत. त्या देवळांतून मूर्तीची पूजा होत असे किंवा नाही. हे निथित सांगण्यास साधन नाही. कारण त्या मूर्ती सापडल्या नाहीत. एका निळ्या इष्टिकाफलकावर एक आकृति एका सिंहासनावर मांडी घालून बुद्धाप्रमाणे बसल्यासारखी काढलेली असून तिच्या दोन्ही बाजूस दोन पूजक गुडघे टेकलेले दाखविलेले आहेत व मुख्य आकृ. तीच्या मागे नागाची फणा दाखविलेली आहे, व तिच्या मागील बाजूस तत्कालीन लिपांत कांहीं हकीगत कोरलेली आहे. राहत्या घरांत सामानसुमान फारसे आढळून येत नाही, परंतु त्यांची बांधणी अप्रतिम असून फार सोयीची केलेली होती. स्यांतील विहिरी, नानगृहे, पाणी जाण्याच्या पक्कचा मोऱ्या, विटांची फरशी या सत्रावरून तेथील लोक संपन्न असून सुखवस्तु असल्याचे सिद्ध होते. रोजच्या उप- योगासाठी दगडी सुन्या असत, परंतु सधन कुटुंबांतून, तांबे, रुपें, सोने व शिसे या धातूंची भांडी व उपकरणेहि आढळतात. रत्नांना पैलू पाडून त्यांना वेजें पाडणे, सोन्याचा उत्तम मुलामा करणे, विटांना पॉलिश देणे व धातूंचे शिक्के कोरणे, वगैरे सर्व कला त्यांना येत असत. या सर्व वस्तू दरेक घरांत सांपडल्या आहेत. विशेषतः