पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

were depictel on elinder scals of the Sumerian period (alhoni -4000. B.C.) (गिलगमेश हा अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेल्या दंतकथांतून वीरपुरुष म्हणून वर्णिलेला आहे व सुमारें त्रिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वीच्या नळ- कांड्याच्या आकाराच्या शिक्क्यांवर त्याच्या पराक्रमाचे वर्णन कोरून ठेवलेले आहे.) या नंतरच्या काळांत तीच कथा विस्तृत स्वरूपाने सपाट विटांवर कोरलेली आहे. अशाप्रकारच्या या कथेच्या लिखाणाच्या बारा मोठाल्या विटा आहेत. त्यांपैकी एका विटेचा फोटो प्रत्यक्ष कल्पना येण्याकरितां पुढे दिला आहे. या विटांपैकी काहींच्या थोड्याशा भागाचे तुकडे पडून गेलेले आहेत. लावरील नष्ट झालेले भाग संदर्भाने जुळविले होते, परंतु हीच कथा आणखीहि इतर विटांवर कोरलेली सांपडल्याने, ते संदर्भ संगतवार लागले आहेत. हे लेख प्रथम सांपडले, त्या वेळी त्यांवरील लिखाण अर्थातच अगदी अज्ञात होते. तें उकलण्याचे श्रेय मुख्यतः जॉर्ज स्मिथ या इंग्रज गृहस्थास आहे. हा लिपिवाचनाचा प्रकार अद्भत असल्याने, तो थोडा विस्ताराने वर्णन केल्यास मनोरंजक वाटेल, असे वाटल्यावरून तो देत आहे. 23A CENTE HTET EF सुमेरी कीललिपि कोरलेली एक वाट. अशा विटांवरच सर्व सुमेरी वाङ्मय कोरले आहे. जॉर्ज स्मिथ हा एका लोहाराचा मुलगा असून त्याचा जन्म सन १८४० साला