पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/135

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्रांतिवादाची पार्श्वभूमि १ : ७

  • मानवी समाजाच्या बौद्धिक व सांकृतिक प्रगतीच्या मार्गात अंधश्रद्धा हा एक मोठा अडथळा आहे. आपली सध्याची मानहानिकारक स्थिति, आपले दारिद्य, दुःख व परावलंबित्व हे नष्ट करावयाचे असेल तर

आपल्या प्रगतीच्या आड येणा-या अंधश्रद्धेची धोंड आपण एकजुटीने उचलून फेकून दिली पाहिजे. अंधश्रद्धा ह्मणजेच आमची नैतिक श्रेष्ठता अगर आध्यात्मिक प्रगति असे मानण्याची सवय आपल्या अंगांत खिळून गेलेली आहे. ती सवय हिंदी जनतेने प्रथम सोडून दिली पाहिजे. हिंदी बांधवहो, तुह्मी ६ बाबा वाक्यं प्रमाणं' ही वृत्ति सोडून बुरसलेल्या वे टाकाऊ अशा सामाजिक चालीविरुद्ध बंड पुकारा; व कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास न ठेवतां जरा डोळस बनून वस्तुस्थितीचे खरे ज्ञान संपादन करा. आपला गतेतिहास कितीहि उज्ज्वल असला तरी जुने तेच सोने ? ही समजूत काढून टाका. -डॉ. रवीन्द्रनाथ टागोर, कोणालाही साहजिकच आश्चर्य वाटते की काँग्रेसने सतत ५० वर्षे साम्राज्यविरोधी लढा चालविला, बहुजनसमाजाच्या क्रांतिकारी उठावांचे निदान दोनदा तरी नेतृत्व पत्करले, पण फलनिष्पत्ति काहीच झाली नाही व नजीकच्या भविष्यकाळात ती होईल असेही पण वाटत नाही. याचे कारण काय ? या वस्तुस्थितीची काहीशी मूलगामी मीमांसा होणे अवश्य आहे. एकाद्या जमिनीत आपण बी अनेक वेळ पेरले; पण ते अंकुरत सुद्धी नाही असे आढळून आले, तर त्या जमिनीत काही दोष असावेत किंवा तिची मशागत बरोबर झालेली नसावी इत्यादि कारणमीमांसा आपण करतो. १८