पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/161

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३९ क्रांतिवाद स्वातंत्र्याच्या लढ्याला • सोव्हिएट' ही घोषणा मारक ठरते. वसाहतीतील लोकाना ‘सोव्हिएट' ची खरी कल्पना त्यावेळी येणे शक्यच नव्हते. संपाच्या प्रसंगी कामगार दगड फेकू लागला ह्मणजे कामगार जागृत झाला, असे ह्मणणे राजकीय अज्ञानाचे द्योतक होय. कम्युनिस्टांच्या धोरणात हा सर्व गोंधळ माजून राहण्यास कारण, कम्युनिस्ट चळवळीचा सुकाणू रॉयसारख्या कुशल कर्णधाराच्या हाती नव्हता. कम्युनिस्टानी बहुजनसमाजाशी व काँग्रेसचळवळीशी कोणते धोरण ठेवावयास हवे होते यासंबंधी रॉय यांचे उद्गार खाली दिले आहेत. त्यावरून कम्युनिस्टांचे कोठे चुकले हे स्पष्ट कळते.“कोणताही पक्ष बळकट करावयाचा #णजे त्याला खालच्या वर्गाकडूनच सक्रिय पाठिंबा मिळाला, तरच तो पक्ष प्रबल पावतो, ज्याना कम्युनिस्ट तत्वे १०० टक्के मान्य आहेत त्यानीच आमच्या पक्षात यावे असा हट्ट धरला तर, हिंदुस्थानात कम्युनिस्ट पक्ष कधीच बलवान होणार नाही. परंतु देशातील इतर वर्गातील लोकांनाहि आपल्या संघटनेत सामील करून घेणे हे कम्युनिस्टांचे काम आहे. त्याकरता ठिकठिकाणी परिषदा बोलावून, त्यांच्यातर्फे आपला व्यापक असा कार्यक्रम जनतेला समजावून दिला पाहिजे. राष्ट्रीय सभा, युवकसंव, स्वयंसेवकदले या संस्थामधूनहि कम्युनिस्टानी अंग मोडून काम केले पाहिजे. ठिकठिकाणच्या काँग्रेस कमिट्यातून आपल्या कार्याला चांगला वाव मिळण्यासारखा आहे. अशा रीतीने देशातील अत्यंत मागासलेल्या व वरिष्ठ समाजाकडून पिळल्या जाणान्या वर्गाच्या सहानुभूतीने, आपली संघटना बलिष्ठ झाली तरच आपण हिंदी स्वातंत्र्याच्या लढ्यात खात्रीने यश संपादन करून क.ग्रेससारख्या संस्थातून भांडवली नेतृत्वामुळे जी स्वातंत्र्याच्या लढ्याची वाताहत होत चालली आहे, तिला पायबंद घालता येईल. हिंदुस्थानात कम्युनिस्ट पक्षाची संघटना जोरदार व्हावी अशी इच्छा असेल तर, त्याला हाच एक मार्ग आहे व स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रश्नानंतरच कम्युनिस्ट समाजरचनेचाही प्रश्न