पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/5

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ 2 हिंदी राष्ट्रवादाच्या उंबरठ्यावर. -~-~-** ** * सांप्रत गांधीवाद ह्मणजेच राष्ट्रवाद असे मानण्याची प्रथा पडलेली आहे. पण वस्तुस्थिति तशी नाही. गांधीवाद आणि राष्ट्रवाद हे एकरूप नाहीत. उलट हे दोन वाद परस्परविरोधी आहेत. ते कसे हे आता पाहू. आधी राष्ट्रवादात कोणता अर्थ गर्भित आहे, व राष्ट्राराष्ट्राच्या निरनिराळ्या वस्तुस्थितीत तो अर्थ कसा पालटतो याचा ऊहापोह होणे अवश्य आहे. काही राष्ट्रात राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञान क्रांतिकारी होऊ शकते तर इतर राष्ट्रात ते प्रतिगामी ठरते ! आजच्या हिंदुस्थानात राष्ट्रवाद हे क्रांतिकारी ध्येय आहे. हिंदुस्थानच्या प्रचलित वस्तुस्थितीत आमूलाग्र बदल झाला पाहिजे अशी ज्याला जाणीव झालेली आहे त्यालाच खरा राष्ट्रवादी ह्मणता येईल. हिंदी स्वातंत्र्याच्या चळवळीस प्रारंभ झाल्यापासून आजपावेतो जे कोणी जनतेचे पुढारी होऊन गेले किंवा जे आहेत त्या सर्वोचे-मग ते कोणत्याही राजनैतिक पक्षाचे असत-असे ठाम मत झाले आहे की, परकीय अमलापासून हिंदुस्थानचे अपरिमित नुकसान झालेले आहे, त्याचा आर्थिक व्हास झालेला आहे, त्याच्या माथी आर्थिक मागसलेपण कायमचे स्थान करून बसले आहे. हिंदी वस्तुस्थितीचे पृथक्करण केल्यास हे स्पष्ट होईल की, जोपर्यंत हिंदुस्थान देश हा परकीय साम्राज्याची वसाहत आहे ह्मणजे जोपर्यंत हिंदी जनता परकीयाकडून पिळली जाते, तोपर्यंत हिंदी राष्ट्राचे कल्याण, प्रगति व उत्कर्ष घडवून आणणारी पार्श्वभूमिका हिंदुस्थानात बनविता येणार नाही. हिंदी जनतेला राष्ट्रीय स्वातंत्र्य हे केवळ जरूर आहे एवढेच नसून तिला त्याशिवाय गत्यंतर नाही; राष्ट्रीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा अख्या राष्ट्राला जीव की प्राण आहे असाच निर्णय ते पृथक्ककरण देईल. । या दृष्टीने विचार केल्यास राष्ट्रवाद हा भावनेचा अगर इभ्रतीचा