पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/8

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) केली, तशाच मासल्याच्या सामाजिक शक्ती हिंदुस्थानातही उदयास येत होत्या. विशेषतः कापूस–विणकाम व्यवसाय हा अत्यंत उर्जितावस्थेप्रत पोचला होता हे जगद्विख्यात आहे. १८ व्या शतकात, किंबहुना १७ व्या शतकातही वस्त्रव्यवसाय ( textile industry ) हा आपली खेड्याची दर ओलांडून मोठमोठ्या शहरात कारखान्यांच्या रूपाने प्रसार पाबत होता. या कारखान्यात लहान मोठे कामक-यांचे तांडे कात–काम अगर विणकाम एकत्र करीत असलेले दृष्टीस पडत होते. कालांतराने उत्पादनाच्या गरजा वाढता वाढता अर्वाचीन यंत्रसामुग्रीचा प्रवेशही येथील व्यवसायात झाला असता. अर्थात् यंत्राने आपल्याबरोबर येथच्या समाजात अनुषगिक पुरोगामी वातावरण आणले असते. इतर देशातील विकासक्रम अशाप्रकारे घडून आला. तो हिंदुस्थातही प्रत्ययास आला असता. हा विकासक्रम परकीय सत्तेने कसा थोपविला आणि केवळ कापसाच्या धंद्याचाच नव्हे, तर येथील अन्य अनेक धंद्यांचा तिने कसा नायनाट केला हे सर्वांना माहीत आहेच. । परकीय आक्रमणाचे हिंदुस्थान देशावर अत्यंत घातक असे कोणते परिणाम झाले ? हिंदी समाजरचनेत क्रांति घडवृन आणण्यासाठी हिंदी क्षितिजावर नुकत्याच उदयास आलेल्या सामाजिक शक्ती ब्रिटिश सत्तेने नामोहरम केल्या ! हिंदी राष्ट्रीय जीवनास सामाजिक क्रांतीची जी ऐतिहासिक अवश्यकता होती तिला जोमाचा प्रतिबंध ब्रिटिश आक्रमणाने केला. हिंदुस्थानास जर जगातल्या पुढारलेल्या राष्ट्रांचा दर्जा प्राप्त करून घ्यावयाचा असेल, तर त्याला या क्रांति दिव्याचाच अनुभव घेतला पाहिजे. ह्मणजे ज्या परकीयसत्तेने हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विकासक्रमास अडथळे आणले तिच्यापासून हिंदुस्थानची सुटका करविली पाहिजे. इंग्लंडला कच्चामाल पुरविण्याठी आणि इंग्लंडचा पक्का माल उजवण्यासाठी हिंदुस्थानची आर्थिक प्रगति थोपविणे ब्रिटिश औद्योगिक हिताच्या दृष्टीने अवश्य होते. या ब्रिटिश अवश्यकतेतच हिंदी आर्थिक व्हासाचे बीज सामावलेले होते.