पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मान्य करण्यांत आला. हा चातुर्वर्ण्यांतील पूर्वीच्या दृष्टीनें सध्यां विशेष आहे. प्रश्नः-जाति ह्मणजे काय ? उत्तर:- भिन्न चालीरीती, भिन्न आचार, आणि भिन्न धंदे यामुळे उत्पन्न झालेल्या समाजांतील गटांस जाती असे म्हणतात. प्रश्न: - अस्पृश्य म्हणजे काय ? उत्तर:-सामाजिक किंवा धार्मिक निन्द्य आचरण केले असतां समाजानें बहिष्कृत केलेल्या माणसास अस्पृश्य असें म्हणतात. प्रश्नः-- अस्पृश्यता कां उत्पन्न झाली ? उत्तरः- -धर्माचरणांत शक्य तितकी पावेत्रता रहावी येवढ्या करितां. प्रश्नः --धर्माचरणाशिवाय इतरत्र अस्पृश्यता मानणे जरूर आहे काय ? उत्तर:- नाहीं. लौकिक व्यवहारांत अस्पृश्यता मानण्या चें कारण - नाहीं. - प्रश्न: - क्षत्रिय आणि वैश्य सध्या आहेत का नाही ? उत्तर:-- आहेत. ते नष्ट होणे केव्हांही शक्य नाहीं. मात्र पारीस्थतिभेदानें त्यांच्या गुणांमध्ये न्यूनाधिक्य होने इतकेच. आश्रमव्यवस्था. प्रश्नः – आश्रम म्हणजे काय ? उतर: – विद्यार्जन, प्रपंच व मोक्षसाधन याकरितां धर्मपंथांनी दिलेल्या कालमर्यादेस आश्रम असें म्हणतात. प्रश्न: - आश्रम किती आहेत ?