पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ब्रिटिश अंमलाचे ध्येय : सर थॉमस मन्रोचे विचार २९५ उद्धाराचे केवढे तरी क्षेत्र आपल्यापुढे आहे. सध्यां नापीक असलेल्या मनोभूमीत चिरंतन चांगलेपणा उत्पन्न करण्याचे बी रुजविण्याचे कार्य ब्रिटिशांच्या कीर्तीस साजेसे आणि ब्रिटिशांच्या परंपरेस पोषक असेच आहे. निःसंशय असेहि अनेक प्रसंग घडतील की ज्यामुळे हे उदार धोरण गढूळ व्हावे. परंतु आपला हा यत्न फसला तरी, आपण चांगला यत्न केला ही जाणीवसुद्धा आपल्या डायरेक्टर कोटस भूषणावह होईल. अभ्यास :--१. पेशव्यांचा ठावठिकाणासुद्धा इंग्रजांनीं कां ठेवला नाहीं ? मोगल बादशाह व ब्रह्मदेशचा राजा थिबा यांच्यासंबंधी इंग्रजांनी काय धोरण ठेवलें ? २. पेशव्यांचे संस्थान असते तर सर्व मराठ-मंडळाची इंग्रजाविरुद्ध कधी काळीं एकजूट झाली असती काय ? वर्गात दोन पक्ष करून कारणासह चर्चा करा. । २५ । । । ब्रिटिश अंमलाचे ध्येय : सर थॉमस मन्रोचे विचार | [ सर थॉमस मन्रो हा एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक उदारमतवादी ब्रिटिश अधिकारी होय. एल्फिन्स्टन, मन्रो, बेंटिक व मेकॉले यांचे या काळांतील लेखन वाचनीय आहे. दुदवाने यांनी प्रतिपादिलेले धोरण अंमलात आलें नाहीं. नेपियर, डलहौसी, लिटन यांच्या धोरणाचे वर्चस्व कायम राहिलें व कर्झनने ते विसाव्या शतकापर्यंत आणून पोहोचविले. मन्रोच्या एका खलित्यांतील उतारा पुढे दिला आहे. --बानर्जी, भा. १, पृ. १६६.] आपल्या सर्व व्यवस्थेत आपण एका गोष्टीकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे. आपल्या सर्व व्यवस्थेचा लोकांच्या चारित्र्यावर काय परिणाम होईल, तें चारित्र्य अधिक उदात्त होईल की त्याची उंची खालावेल हा मूलगामी प्रश्न आहे. आपल्या हाती सर्व सत्ता ठेवून हिंदुस्थानांतील नागरिकांचे रक्षण तेवढे करावे म्हणजे आपले काम झाले, मग ते आज आहेत त्यापेक्षां मनाने दुर्बल व कमकुवत झाले तरी चालतील, हे धोरण बरोबर, की त्याऐवजी त्यांच्यांत दिवसेंदिवस सुधारणा करण्याचे धोरण ठेवून त्यांना आपला कारभार [४१ १९ सा.इ.