पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/120

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ इ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास गळयांतीलहि असेच मौल्यवान् हार काढून घेतले. त्या सर्वांची किंमत जयपाळाच्या हाराच्या दुप्पट होती. ईश्वराने आपल्या साथीदारांना अमर्याद लूट तर दिलीच ; परंतु सुंदर स्त्रिया व पुरुष मिळून पांच हजार गुलामहि दिले. अशा त-हेनें ईश्वरकृपेनें लूट करून आणि विजय मिळवून जगन्नियंत्याला धन्यवाद देत सुलतान आपल्या तळावर परत आला. कारण सर्वसमर्थ ईश्वराने खुरासान प्रांतापेक्षां हिंद देशांतील अधिक सुपीक, अधिक विस्तृत अशा प्रांतावर त्याला विजय दिला होता. हे प्रसिद्ध व पराक्रमशाली युद्ध ३९२ हिजरी तारीख ८ गुरुवार रोजी झालें. (२७ नोव्हेंबर १००१) | अभ्यास:--१. हिंदुस्थानवर स्वारी करण्यांत सुलतान महमुदाचे काय हेतु होते ?. २. युद्धापूर्वी त्याने काय काळजी घेतली ? ३. पराभवानंतर या युद्धांत जयपाळाची काय स्थिति झाली ? त्याचे सैन्य इतके मोठे असून पराभव कां झाला ? ४. यानंतर महमूदाने आपल्या देशावर किती स्वाच्या केल्या? ५. अल्-उत्बच्या मते ईश्वराचे शत्रु नि मित्र कोण होते ? त्याने असे कां लिहिले ? ३ । । । महमुदाच्या नाण्यावर नागरी लिपि [सुलतान महमूद गझनवीने हिंदुस्थानांतील प्रजेसाठीं जें नाणे पाडले होते त्यावर नागरी लिपींत आणि संस्कृत भाषेत पुढील मजकूर दिला होता.]* | " अव्यक्तमेकं मुहम्मद अवतार, नृपति महमूद अयं टंको महमुदपुरे घटे हतों, जिनायन संवत-" याचा अर्थ पुढीलप्रमाणे :- । “एक अव्यक्त ( ला इलाह इल्लिलाह ), अवतार मुहम्मूद ( मुहम्मद रसूल इल्लाह) राजा महमूद याच्याकडून हे नाणे महमूदपूर (लाहोर)

  • पं. जयचंद विद्यालंकार यांच्या इतिहासप्रवेश पुस्तकांत पृष्ठ २१६ वर हे अवतरण दिले आहे.

४]