पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/144

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास हे लोक जमल्यावर शेरशाहाने सैन्यासहि बोलावले. त्यांना तो म्हणाला ...." गरीब शेतक-यावर शेती अवलंबून आहे हे मी चांगले जाणतो; त्यांची स्थिति वाईट असेल तर ते कांहींच उत्पादन करणार नाहीत, परंतु ते सुस्थितीत असतील तर ते पुष्कळ उत्पन्न काढतील. शेतक-यांकडून वसुली करतांना काय जुलूमजबरदस्ती तुम्ही करतां ते मला माहीत आहे; म्हणूनच मोजणीच्या प्रमाणांत सरकारदेणे आणि सारा गोळा करण्याचा मेहनताना मीं ठरवून दिला आहे. तुम्ही जर ठरल्यापेक्षा अधिक वसुली केलीत तर तर ती तुमच्या हिशेबांत तुम्हाला धरता येणार नाहीं. : | " जमिनीची मोजणी करण्याच्या वेळी शेतक-याला सहानुभूति दाखविणे व प्रत्यक्ष उत्पादनाला त्यास समर्थ करणे हे राज्यकत्र्याला योग्य आहे. परंतु सरकारदेणे देण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्याने कुठलीहि सवलत न देतां कडक रीतीनें सारा गोळा केला पाहिजे. त्याला जर असे आढळले कीं, किसान देण्याची टाळाटाळ करीत आहेत तर त्याने त्यांचा छळ असा करावा कीं इतरांनी त्याजपासून बोध घ्यावा. मग तो शेतक-यांना म्हणाला “तुमच्या ज्या कांहीं तक्रारी असतील त्या तुम्ही नेहमी माझ्यापुढे मांडा. तुमच्यावर कोणाकडूनहि मी जुलूम होऊ देणार नाहीं . सर्व लोक गेल्यावर आपल्या अधिका-यांना फरीद (शेरशाह) म्हणाला, उन्नतीचे मूळ शेतकरी होत. मी त्यांना उत्तेजन देऊन परत पाठविलें आहे. त्यांच्यावर कोणी जुलूम जबरदस्ती करतो की काय यावर माझे लक्ष राहील, कारण बेकायदा वागणुकीपासून बिचा-या शेतक-यांचे जर राज्यकर्ता रक्षण करू शकत नसेल तर त्याने त्यांच्याकडून सारा गोळा करणे म्हणजे -शुद्ध जुलूम होय. २८]