पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ भारतवर्षाचे अखंडत्व ९ । । .. :::..: भारतवर्षाचे अखंडत्या | [ हिंदुस्थान हैं सांस्कृतिक दृष्टीने अखंड आहे, ही कल्पना केवळ.. इंग्रजी अमलांत उत्पन्न झाली असें नाहीं. इंग्रजांचे जसे या देशावर : : एकछत्री रज्य होते तसे करण्याचा यत्न जुन्या राजांनी केला. अश्वमेध यज्ञाचे स्वरूप असेच असे. चंद्रगुप्त मौर्य, अशोक, समुद्रगुप्त, हर्ष, पुलकेशी व राष्ट्रकूट राजे या सर्वांचा प्रयत्न भारतवर्षभर एकछत्री राजकीय अंमल करण्याचा होता. त्या सर्वांच्यापेक्षां इंग्रजांना त्यांत । यश अधिक आले. परंतु यामुळे भारतवर्षाच्या एकात्मतेची कल्पना . त्यांनी दिली असे होत नाही. त्यांच्या एकछत्री सत्तेमुळे ती कल्पना : वाढीस लागली असे फार तर म्हणता येईल. पण त्यासाठी इंग्रजांनी हेतुतः कांहींच केले नाही. केलेच असले तर हा देश सोडतांना या देशाचे स्वतंत्र तुकडे करून ते निघून गेले ! महाकाव्ये आणि पुराणे यांमधून भारतवर्ष एक आहे' ही कल्पना ग्रथित झालेली आहे. या महाकाव्यांच्या कालांतहि अश्वमेध करून भारतवर्षभर एकछत्री राज्य स्थापण्याचे ध्येय प्राचीन राज्यकत्र्याचे होते असे आढळते. या दृष्टीने व्हिन्सेंट स्मिथनें ‘दी ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया'च्या प्रस्तावनेत पृ. ८-११ केलेले विवेचन वाचनीय आहे. . पुढे विष्णु-पुराणांतील उतारा दिला आहे. (हीच कल्पना दर्शविणारी मराठेकालीन गोविंदराव काळे व रघुनाथराव यांची पत्रे त्या भागांत वाचावीं.) । सर्व १८ पुराणे एकाच वेळीं रचिलों गेली नाहीत. त्यांचा प्रारंभ , सि.पू. चौथे शतक असावा, पण त्यांना आजचे स्वरूप गुप्तकालाच्या सुमारास आलें असें विद्वान मानतात. या अठरा पुराणांत मत्स्य, वायू, विष्णू ही प्रमुख होत. पुराणे म्हणजे इतिहास नव्हे, परंतु त्या कादंब-याहि । नव्हेत. सामान्य लोकापर्यंत प्राचीन आचार-विचारांचे लोण अनेक : कयांच्या द्वारा पोहोचविण्यास पुराणांतील गोष्टींचा उपयोग होतो.. त्यांत दिलेल्या राजांच्या वंशावळीचा प्राचीन इतिहासकारांस पुष्कळ । उपयोग झाला आहे । उत्तरम् यत् समुद्रस्य । | हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम । भारती यत्र संततिः ।। -विष्णुपुराण ३: है।