पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/96

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उदार नृपति हर्ष याचा लेख । ...सर्वास माहीत व्हावे कीं (माझे) वडील परमभट्टारक महाराजाधिराज प्रभाकरवर्धन आणि मातोश्री भट्टारिका महादेवी यशोमतिदेवी आणि आदरणीय बंधु परमभट्टारक महाराजाधिराज राज्यवर्धन यांचे धर्मप्रेमवर्धन करण्यासाठी माझ्याकडून उपर्युक्त – ( मर्कटसागर ) ग्राम...अग्रहार-म्हणून.. यावच्चंद्रदिवाकरौ, राजकर आणि अन्य कर यापासून मुक्त, भारद्वाजगोत्री ..भालचंद्र आणि भद्रस्वामी या ब्राह्मणांस दिलेले आहे. हे जाणून ग्रामस्थानी..आमच्या आज्ञेनुसार या (ब्राह्मणां) ना नेहमीचे वजन, मापन, सुवर्ण करमणूक यावरील कर द्यावे, यांची योग्य सेवा आणि सन्मान करावा..... आमच्या कुलाची उदार परंपरा अनुसरणारांनी आणि इतरांनीहि या दानास अनुमोदन द्यावे. पाण्यां तील बुडबुड्याप्रमाणे किंवा विजेप्रमाणे चंचल असणा-या लक्ष्मीचे पारितोषिक म्हणजेच परयशपरिपालन व दान. कर्मणा मनसा वाचा कर्तव्यं प्राणिभिर्हितं । हतत्समाख्यातं धर्मार्जनमनुत्तमम् ॥ ....संवत् २२, कार्तिक वद्य १. उदार नपति हर्ष (३-३(२ (१८३१ ८८(।। स्व हे स्तोम म म हा रा जा धि रा ज श्री हर्ष स्य।