पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/91

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे. या प्रांतांत सन १८९२।९साली दिस्ट्रिक्ट कमिटया चार होत्या व ४४ जिल्हेबोर्डे होती. एकंदर सभासद १६३८ होते. त्यापैकी १२८६ लोक- नियुक्त व ३५२ सरकारनेमणुकीचे होते. पंजाब प्रांतांतही लोकल वोर्डाची व्यवस्था पहिल्याने साधारण वायव्य प्रांताप्रमाणेच होती. सन १८७१ सालापासून १८८३ पर्यंत या बोडाँस उत्प- नाची मुख्य बाब ह्मणजे जमिनीवरील कर हीच होती. सन १८७१ चे काय- द्याने जिल्हेकमिटया स्थापन झाल्या; यांचे प्रेसिडेंट डेप्युटी कमिशनर असत व सभासद सरकारी नौकर असत. सन १८८३ साली दिस्ट्रिक्ट बोर्डाचा कायदा अमलांत आला व तो २१ जिल्ह्यांस लागू करण्यांत आला. त्यांत जिल्हे- बोडीशिवाय पोटविभागांची बोर्डे स्थापन झाली; व त्या वोडाँचे सभासदांचे संबंधाने निम्मेपेक्षा जास्त सभासद लोक नियुक्त असावेत असें ठरविण्यांत आले. दिस्ट्रिक्ट वोर्डे डेपुटी कमिशनर यांसच प्रेसिडेंट नेमून घेत आली आहेत. प- श्चिमेकडील १२ जिल्ह्यांत अजून सभासद सरकारांतून नेमण्यांत येतात. सन १८९१।९२ साली नेमणुकीचे सभासदांची संख्या पूर्वीचे पेक्षां वाढली, कारण रुळीप्रमाणे नेमणुकीच्या जागा ठरलेल्या होत्या, तितके सभासद या साली नेमण्यांत आले. काही ठिकाणी निवडून घेण्यास सभासदच पुढे आले नाहीत व दिल्लीस तर लोकनियुक्त सभासदांनी आपले जागेचे राजीनामे देऊन सरकार- तर्फे आपली नेमणूक करून घेतली. ४ जिल्ह्यांत निवडणूक झाली त्यांत लो- कांची कोणत्याही प्रकारची आस्था दिसून आली नाही. एकंदरीत जिल्हेवोर्डीचे संबंधाने सरकारचा अभिप्राय अनुकूल आहे; परंतु पोटविभागांचे बोडींचे हा- तून कामें करविण्यास फारच अडचण पडते असे त्यांचे अनुभवास आले आहे. सन १८९२।९३ सालापर्यंत सरहद्दीवरील १२ जिल्ह्यांत सभासदांची नेम- णूक सरकार करीत आहेत; बाकी १ बोर्डीत कांहीं सरकारांनी नेमलेले अस- तात व काही तालुका बोर्डीतून नेमून देतात अशी स्थिति आहे. जिल्हा बोडौंचे खालचे दर्जाची बोर्डे ८३ होती, त्यांपैकी १५ सभांत सभासद सरकार नेमतें, बाकीच्या बोर्डीत अंशतः लोक नियुक्त असतात. मध्यप्रांतांत लोकल बोर्डीची स्थापना सन १८८३ सालांत पहिल्याने झाली. पूर्वी रस्ते व शाळा यांचेसाठी कांहीं कर घेण्यांत येत असत, परंतु त्यांची सर्व व्यवस्था सरकारी अंमलदारांचे हातूनच होत असे. १८८३ चे पहिले कायद्याने भागाभागांचे समुदायांसाठी एक एक लोकल बोर्ड व त्यांचेवर जिल्हा बोर्ड अशी दोन बोर्डे स्थापन केली. लोकल बोर्डातील सभासदांचे तीन वर्ग आहेत. (१) मुकादम (ह्मणजे गांवचे प्रमुख इसम) गांवांचे तर्फे निवडलेले,