पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/122

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्क्सवाद आणि बोल्शेव्हिक रशिया ११३ विषयीं जोसेफ डेव्हिस' लिहितो, ‘रशियन राष्ट्रवादाच्या उत्थानासाठी हे बोल्शेव्हिक लोक जुन्या ऐतिहासिक व्यक्तींचा त्याचप्रमाणे राजघराण्याचा उपयोग करीत आहेत हे आश्चर्यकारक वाटते. स्वयंनिर्णयाविषयी बोलतांना उठल्यासुटल्या रशियाचे उदाहरण दिले जाते. परंतु त्याविषयी थोडासा अपसमज आहे. रशियांत स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे; पण त्याचा उपयोग मात्र करितां येत नाही. याविषयी हर्टस म्हणतो, सर जॉन मेयनार्ड नांवाचे सोव्हिएट रशियावरील तज्ज्ञ तसेच सोव्हिएटविषयी सहानभूति असलेले गृहस्थ पूर्ण अभ्यासांती अशा निर्णयास आले की, ‘राशियांतील राज्यकारभाराची पद्धति आत्यंतिक एकमुखी अशी आहे. फेडरेशनमधील प्रत्येक घटकास राज्यघटनेने खरी सत्ता जवळ जवळ दिलेलीच नाही. राज्यघटनेने दिलेला स्वयंनिर्णयाचा अधिकार हा केवळ कागदावरच आहे. सोव्हिएट संयुक्त संस्थानांतील एखाद्या घटकाने स्वातंत्र्य प्रकट केलें, अथवा कम्युनिस्ट पार्टीच्या आदेशाविरुद्ध किंवा बोल्शेव्हिक कल्पनांच्या विरुद्ध जर निबंध करण्याचा प्रयत्न केला, तर असा प्रयत्न कडकपणे दाबून टाकण्यांत येईल. (पृ. १९४) जीवनाचे तत्त्वज्ञान म्हणून माक्र्सवादाचा रशियाने स्वीकार केला आहे याचा अर्थ पूर्वीच्या सर्व जीवनपद्धतींचे निर्मूलन रशियांत झालेले असावे असे गृहीत धरावे लागते. परंतु परराष्ट्रीय धोरणाविषयी लिहितांना सम्नर वेल्स म्हणतो, ‘सोव्हिएट रशियाच्या पुरस्कर्त्यांनी कितीही नाकारले तरी, एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, गेल्या पंधरा वर्षांच्या सोव्हिएट शासनांत युरोपातील इतर राष्ट्रांबाबत आणि तसेच जागतिक धोरणा संबंधीची रशियाची भूमिका नि कार्यपद्धती यांचे गेल्या दोनशे वर्षांतील रशियन सरकारच्या भूमिकेशीं नि कार्यपद्धतीशी उघड साम्य आहे. येथपावेतों राशियांतील प्रचलित परिस्थितीचा परामर्ष रशियावरील १ मिशन टु मॉस्को : पृ. १५३२ टाइम फॉर डिसिशन् : पृ. २४०