पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/23

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व अथवा राष्ट्रीयत्व निर्माण करणा-या घटकांविषयीं व्याख्याकारांत मतैक्य नाहीं. जो तो व्याख्याकार आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे ह्या संज्ञांच्या व्याख्या करितो, आणि आपणांस आवश्यक वाटणा-या घटकांवर भर देतो. दुसरे असे की, हे लेखक युरोपीय असल्याने त्यांची दृष्टि युरोप आणि अमरिका यांपलीकडे सहसा जातच नाही. त्यांतही समग्र युरोपाऐवजी युरोपातील केवळ पश्चिमेकडील राष्ट्राचाच (Western nations) तेवढा विचार त्यांच्या हातून होतो. त्यांच्या विचारांना अशाप्रकारे लगाम बसल्याने युरोप अथवा अमेरिकेच्या बाहेर दुसरे समाज आहेत, त्यांनाही स्वतःचा इतिहास, परंपरा, संस्कृति आहे, हैं या वैचारिकांकडून ध्यानांत घेतले जात नाही; आणि घेतले गेलीच तरी ते वरवरच. अशा प्रकारें दृष्टि विकृत होण्यास एक ऐतिहासिक कारणपरंपरा आहे. सुमारे तीन शतकांपूर्वी प्रथम इंग्लंडमध्यें परिणामकारक असे वैज्ञानिक शोध लागले. त्यांतला सर्वांत महत्त्वाचा शोध वाफेचा. कारण वाफेमुळे यंत्रे सुरू झाली. उद्योगधंद्यांत यंत्रयुग सुरू होऊन, तोंवर प्रचलित असलेल्या उद्योगधंद्यांच्या जुनाट पद्धतीस सुरुंग लागला. अधिकाधिक लाभ कसा मिळेल याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले. त्या लाभाच्या आड स्वदेशांतील समाजरचना येते असे दिसतांच ती पालटविली गेली. यामुळे एक सामाजिक स्थित्यंतर झाले. नव विचार, नवीन निर्वेध (कायदे), नवीन समाजरचना, नवीन वर्ग या स्थित्यंतराने आणले. आगगाडीसारख्या दळणवळणाच्या नवीन साधनांनी नि वर्तमानपत्रांनी अंतर आणि वेळ यांचा दीर्घपणा नाहींसा केला. याने समाजाची दृष्टि विशाल झाली. व्यापारास मोकळीक मिळावी यासाठी युद्धे झाली. युद्धांत विजय होण्यासाठी समाजांतील एकत्वाची जाणीव प्रखर करणे आवश्यक वाटू लागले. आणि त्यामुळे त्या दिशेने प्रयत्नही झाले. हे प्रयत्न नुकत्याच झालेल्या सामाजिक स्थित्यंतरामुळे यशस्वी झाले. औद्योगिक क्रांति इंग्लंडमध्ये प्रथम झाल्याने सर्वांआधीं त्या ठिकाणी एकत्वाची मूळ भावना अधिक