पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व एकसंधी समाजाची कल्पना असून जेथे अल्पसंरव्यांकांच्या भूमिकेस स्थान नाहीं असें हिंदी-राष्ट्र हिंदुस्थानामध्यें निर्माण झालेले नाही. परंतु त्याऐवजी हिंदु नी मुसलमान हे दोन्ही समाज आपापल्या पृथक् राष्टवादाची उपासना अजूनहीं करीत आहेत; असे सावरकरांचे दुसरे विधान आहे. ह्या दोन्ही समाजांची राष्ट्रीयत्वाची कल्पना भिन्न आहे. मुसलमानांचे राष्ट्रीयत्व काय आहे याची कल्पना पंजाबीच्या वर दिलेल्या उतान्यावरून येतेच. जगभर कुठेही असलेले मुसलमान राष्ट आहेत असे मुस्लिम राष्ट्रवाद मानतो आणि त्यामुळे हिंदुस्थानांत मुसलमान अल्पसंख्य असले तरी मिलतच्या कल्पनेनुसार ते राष्ट्र आहेत, इतकेच सावरकरांचे निगमन आहे. हिंदू-मुसलमानांतील भेद ब्रिटिश राजनीतीने निर्माण केलेला आहे, हें विधान आपणांस चिरपरिचित आहे. ह्या विधानांत थोडासा सत्यांश आहेही. परंतु हिंदुमुसलमानांत मुळांत विरोध नव्हताच, नि आज जो विरोध दिसतो तो केवळ ब्रिटिश राजनीतीनेच निर्माण केलेला आहे, असे कोणी म्हटल्यास ते सर्वाशीं स्वीकारता येत नाही. कारण आपणांस हे ध्यानात ठेविलें पाहिजे कीं, सर्वसामान्य मुसलमान हा ‘मिलत' च्या विचारांतून मुक्त होत नाही. त्यामुळे ज्या भूमीवर तो राहात असतो त्या ठिकाणी राहाणाच्या मुसलमानेतर समाजांपासून आपले व्यक्तिमत्व पृथक् ठेवण्याचा तो सहजच नी नित्य प्रयत्न करतो. त्याच्या मनांतील मिलतची जाणीव त्यास भूमिनिष्ठेपासून दूर ठेवते. ह्या विधानाच्या पुष्ट्यर्थं पुढील उदाहरणे मननीय वाटतील. त्यांतील पहिली दोन हीं ज्या ठिकाणी ब्रिटिश राजनीतिचा कावा हिंदुस्थानातल्याइतका बद्धमूल झाला नव्हता अशा हिंदुस्थानेतर देशांची आहेत. डॉ. स्मिथने आपल्या ग्रंथांत वेलेस नांवाच्या लेखकाचा उतारः १ डॉ. ओके स्मिथ : रेस अँड् नॅशनैलिटि, पृ. ७७-७८