पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ४ थें। प्रकरण ४ थे ਹੈg ਜਾਣਦਾ ॥ . हिंदु राष्ट्रवाद Gन्छ। [ विभाग १] हिंदीराष्ट्रवाद आणि इस्लामीराष्ट्रवाद ह्या दोन विचारधारांचे समालोचन मागील दोन प्रकरण केले. आतां ह्या प्रकरणांत हिंदुराष्ट्रवादाचे विवेचन करावयाचे आहे. पहिल्या प्रकरणाच्या अंती काढलेल्या हिंदुत्व हेंच राष्ट्रीयत्व या सिद्धांताचे स्वरूप नीट समजणे हे पूर्वीच्या दोन प्रकरणांपेक्षां, ह्या प्रकरणांतील विवेचनावर अधिक अवलंबून असल्यानें हैं प्रकरण विशेष महत्त्वाचे आहे. या प्रकरणांत पुढील गोष्टींचे सत्यशोधन केले आहे. दुसमाजांतील एकत्वाची अविच्छिन्न जाणीव दाखविणारा ऐतिहासिक पुरावा. (२) हे एकत्व निर्माण करणारीं कारणे, (३) हिंदुराष्ट्रवादावरील आक्षेप आणि त्यांचे निराकरण. (४) निधर्मी शासनाच्या तत्त्वज्ञानाच्या निर्मितीचा इतिहास, (५) हिंदुत्वाची व्याप्ति. । वरील गोष्टींच्या सत्यशोधनाने हिंदुत्वावर घेण्यात येणारे सर्व आक्षेप कसे फोल आहेत हे समजू शकेल. ह्या राष्ट्रवादावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘हिंदुत्व’, श्री. बाबाराव सावरकर यांचे ‘राष्ट्र-मीमांसा' आणि श्री. माधवराव गोळवलकर यांचे ‘आम्हीं कोण' असे एकंदर तीन ग्रंथ