पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/79

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.७० हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व वागूनहि आम्हीं कलकत्यावर धडक मारूं. जो कांहीं देश आम्हीं परत हस्तगत करू तो सर्व गुरखा सरकारच्या स्वामित्वाखाली राहिल्यास प्रत्यवाय नाही. केवढा प्रचंड स्वार्थत्याग ! आणि कशासाठीं ? इंग्रजांपासून जिंकलेले प्रदेश गुरख्यांना द्यावयाचे मग ते जिंकावयाचे तरी कशाला, असा स्वार्थी प्रश्न नानासाहेबांसमोर जराही आला नाही. हिंदुस्थानचे राज्यकर्ते पेशवे राहावेत की गुरखे व्हावेत, हा प्रश्न नानासाहेबांस फारच गाण वाटला. कारण, कसेंही झाले असते तरी राज्य हिंदूचेच राहात होते. मुसलमानांचे किंवा टोपीकरांचे राज्य होऊ नये यासाठीच तर मुळा नानासाहेब स्वत:चे रक्त सांडण्यास सिद्ध झाले होते ! नानासाहेबाच्या ह्या विनंतीस गुरख्यांचा तत्कालीन राजा मान्यता देऊ शकला नाही, याचे कारण त्यावेळची राजकीय परिस्थितीच तशी होती. संघटितपणांत नि शस्त्रबलांत अनेक पटींनी इतर राष्ट्रांस भारी ठरून जगभर राज्य कमवीत चाललेले इंग्रज गुरख्यांच्या टिचभर हिंदुराज्यास केव्हांच जिंकू शकले असते. ही शक्यता नि भीति मनांत असल्याने गुरख्यांच्या राजाने नानासाहेबांच्या विनंतीचा अव्हेर केला असावा. परंतु नानासाहेबांची विनति अव्ड़ेरली गेली असली तरी, नानासाहेबांनी व्यक्तविलेली हिंदुत्वाची भावना ही त्यांच्यांत तेवढी होती नि गुरख्यांत नव्हती, असे म्हणणे सयुक्तिक ठरणार नाही. कारण तीच हिंदुत्वाभिमानाची परंपरा आजवर उभयपक्षीं अविच्छिन्न राहिल्यानेंच, इंग्रजांना साह्य करणारे नेपाळचे नरेश सावरकरांना लिहिलेल्या पत्रांत' म्हणतात, ‘नेपाळची सीमा मी वायव्य प्रांत समजतो. हिंदुस्थानांत हिंदुत्वाचा नाश झाला तर नेपाळचा नाश होईल, नी हिंदुत्वाची वृद्धि झाली तर नेपाळचीही होईल." ह्याच सत्तावनच्या स्वातंत्रसमरांत जगप्रसिद्ध झालेली झांशीची १ ग. रं. भिड : सावरकर सूत्रे, पृ. ३९ ।।