पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/87

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व पुन्हां धुवून पुसून स्वच्छ करून व सतेज करून जनतेपुढे आचार्यानीं ठेवला. (१) बद्रिकेदार (हिमालय), (२) द्वारका (सौराष्ट्), (३) जगन्नाथपुरी (बिहार) आणि (४) शृंगेरी (म्हैसूर) ही चार धामें म्हणजे अखंड भारतवर्षाची सुरक्षित अशी चार केंद्रेच होत. ही चारही धामें एका आर्य राजाच्या अधिकारामध्येच असली पाहिजेत. तसेच प्रात:काळीं स्नान नी देवपूजा उरकणारे अनेक भाविक हिंदु, * गंगे च यमुने चैव गोदावरि, सरस्वति । नर्मदे सिंधु कावेरि जले ऽ स्मिन्सन्निधिं कुरु’ असा जो मंत्र म्हणतात, त्यांतील नद्यांच्या नामौघांत सगळा हिंदुस्थान गवसला जातो. ज्याप्रमाणे नद्या, त्याप्रमाणेच हिंदूमनाला पवित्र वाटणारी तीर्थक्षेत्रे, की जेथे एकदां स्नान घडलें तरी मुक्ति मिळते तीही, समग्र हिंदुस्थानास आपल्या कक्षेत घेतात. नी म्हणूनच स्नानारंभीं गङ्गाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते । स्नात्वा कनखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते । " असे म्हणून, तद्वतच प्रातःस्मरणांत ‘अयोध्या, मथुरा, माया, काशी, काञ्ची, अवन्तिका । पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाःया श्लोकानें हिंदू मनाला पवित्र वाटणा-या स्थळांच्या रूपाने, निखिल हिंदुस्थानाचें मानचित्रच, एकत्वाच्या जाणिवेने, हिंदू आपल्या कल्पनाचक्षुपुढे उभे करितो. बारा ज्योतिर्लिङ्गांचे दर्शन घेणे हेही एक आवश्यक धर्मकृत्यच ठरविल्याने, तन्निमित्त यात्रेस निघालेला हिंदु हा सौराष्ट्रांतील सोमनाथ, श्रीशैलावरील मल्लिकार्जुन, उज्जयिनींतील महाकाल, मान्धातृपुरातील ओंकारेश्वर (कावेरी नी नर्मदा यांच्या संगमावर ), अशारीतीनें वैजनाथ, भीमशंकर, रामेश्वर, नागनाथ नी विश्वेश्वर, केदारनाथ नी । १ राधाकुमुद मुकर्जी : नॅशनलिझम् इन् हिंदु कल्चर, पृ. ५४ , पृ. ५५ }}