पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/90

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ हिंदु राष्ट्रवाद हेच राष्ट्र होत’ हा सिद्धांत आपण क्षणभर जरी बाजूला ठेवला तरी, वरील प्रमाणाने खंडित हिंदुस्थानांतही हिंदु हेच राष्ट्र ठरतात. पाकिस्ताननर्मितीनंतर नेहरूंच्या" मद्रासमध्ये झालेल्या भाषणानेही आमच्या ह्या विधानास पुष्टीच मिळते, “ बहुसंख्यांकांनी अल्प संख्याकांना सहनशीलता दाखविली पाहिजे असे नेहरू म्हणतात. याचा अर्थ असा की, अजूनही खंडित भारतांत जे बहुसंख्य हिंदु आहेत त्यांनी झाल्यागेल्या गोष्टी विसरून अल्पसंख्यांकांशीं उदारपणे बागले पाहिजे. * बहुसंख्याकांनी वर्तणूक कशी ठेवावी' हा नेहरूंच्या भाषणांतील मुद्दा येथे अप्रस्तुत म्हणून बाजूस ठेवून त्यावरून सूचित झालेल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. नेहरू म्हणतात त्याप्रमाणे, खंडित भारतांतही अजून बहुसंख्य नि अल्पसंख्य अशी समाजाची विभागणी असेल तर, त्या समाजास एकरसी हिंदी समाज असे कसे म्हणता येईल ? आणि पुनः नेहरूंच्या विधानाप्रमाणे अल्पसंख्य' असे निराळे कोणी असल्यास, मग ‘बहुसंख्यांक हेच राष्ट्र आहेत, असा सिद्धांत कोणी मांडला तर त्यांत अराष्ट्रीय किंवा जातीय तें काय ? । सावरकरांनीं कर्णावतीच्या ( अहमदाबादेच्या ) हिंदु महासभाअधिवेशनांत आपल्या अध्यक्षीय भाषणांत, हिंदु राष्ट्राची राज्यघटना ज्या तीन तत्त्वांवर अधिष्ठित असेल असे सांगितलें तीं तीन तत्वे अशी :-(१) प्रत्येक माणशी एक मत. (२) लोकसंख्येच्या प्रमाणांत प्रतिनिधित्व आणि (३) पात्रतेप्रमाणे नोकया. विशुद्ध लोकशाहीवर आधारलेली ही जी राज्यघटना सावरकरांनी सुचविली तिच्याहून अधिक विलोभनीय असें खंडित भारताच्या स्वीकृत राज्यघटनेतही आज तरी काय आहे १ ‘राष्ट' या विषयासंबंधीच्या तात्त्विक चर्चेत शासनसंस्थेलाही गोवल्या कारणाने, तसेच राष्ट्र (Nation) आणि शासनसंस्था १ टाइम्स ऑफ इंडिया,