पान:हिंदुस्थानचें राष्ट्रीयत्व.pdf/92

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ हिंदु राष्ट्रवाद वल्लभ, येशूखिस्त, महंमद, बुद्ध, महावीर, मस्करी गोशाल किंवा झरदुष्ट यांपैकी कोणाचाही अनुयायी असेल, तर तो हिंदु राहतो. तो वेदांचे तत्वज्ञान मानील, अॅरिस्टॉटलच्या ग्रंथाचे परिशीलन करील; सांख्याचा अनुयायी होईल, अगर डार्विनवर विश्वास ठेवील..त्याचे वैशेषिक तत्वज्ञान आवडते असेल; तो तत्वज्ञानांत स्वतःस प्लेटो, थॉमस अॅक्विनास अगर आधुनिक कालांतील विल्हेम फुट, ब्रैडले, फुईली, गुया, नित्से, रुडोल्फ आयकेन अगर विल्यम जेम्स यांपैकी कोणाचाही शिष्य मानून घेईल. परंतु आचाराचे बाबतींत जर समाजाचे नियम पाळील तर, तो हिंदूच राहील. अशा तन्हेचे आध्यात्मिक स्वातंत्र्य दुस-या कोणत्या धर्मात आहे ते कोणीही आम्हांस दाखवावे अशी सर्व पंडितांना सप्रश्रय प्रार्थना आहे. इतर धर्माचे तसे नाही. खिस्त्यांचा बायबलावर आणि मुसलमानांचा कुराणावर विश्वास असलाच पाहिजे." याप्रमाणे हिंदुधर्मात आध्यात्मिक स्वातंत्र्य आहे ही नुसती पुस्तकी गप्प नाही. भारताचार्य चिं. वि. वैद्य' म्हणतात, " एकाच राज्यांत किंवा एकाच शहरांत, किंबहुना एकाच कुटुंबात देखील हिंदु, बौद्ध वे जैन या धर्माचे अनुयायी गुण्यागोविंदाने राहून धर्माच्या गहन तत्त्वांवर अत्यंत सहनशीलतेने वादविवाद करीत. त्यावेळीं असा चमत्कार पाहावयास सांपडे की, एकाच कुटुंबांत बाप शैव तर मुलगा बौद्ध असून, तोही पुढील आयुष्यांत मत पालटल्यास धर्मातर करी; व हे धर्मातरे त्याच्या कौटुंबिक किंवा सामाजिक नात्याच्या आड येत नसे. “ पिता परम वैष्णव असेल तर मुलगा परम माहेश्वर असतो; व नातु भगवतीभक्त असतो तर पणतु आदित्य-उपासक होतो; पण त्यामुळे उपासकांमध्ये वैरभाव उत्पन्न होत असे असे मात्र नाही. तेव्हां हिंदु मनुष्य हा १ चिं वि. वैद्य : मध्ययुगीन भारत पृ. १४५ २ चिं. वि. वैद्य : मध्ययुगीनभारत पृ. २८१ (भाग २)