पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/43

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ मिळाल्यामुळे व ती उत्पन्न करण्यासंबंधाने योग्य काळजी न घेतल्यामुळे तेथली गुरे फार अशक्त आहेत, " आधीच चाऱ्याची टंचाई आणि त्यांत पावसाच्या अभावानें गवत कमी झाले ह्मणजे सरकारची जंगलें नजरेपुढे असतां बिचाऱ्या शेतकऱ्यांस लेंकरापेक्षा आवडत्या अशा आपल्या गुरांस, की, ज्यांच्यावर त्यांची सर्व मदार त्यांस, प्राण सोडतांना पाहून किती क्लेश होत असतील बरें ! गेल्या दुष्काळांत सरकारांतून कांहीं जंगले खुली करण्यांत आली होती; तरी देखील एकट्या गुजराथेत सरासरी दहा लक्ष गुरें मेलीं! केवळ वैरण नाही ह्मणून पंजाबांत शंभर रुपये किंमतीचे घोडे दहा पंधरा रुपयांस विकले आणि काहींनी तर त्यांची उपासमार पाहवेना ह्मणून त्यांस गोळ्या घालून ठार केले. पन्नास पन्नास रुपये किंमतीची गुरे रुपया दोन रुपयासअगदी त्यांच्या कातड्यापेक्षाही हलक्या किमतीसदशावर विकलेली आमच्या वाचकांपैकी कित्येकांनी पाहिली असतील. केवढा हा अनर्थ! दुष्काळाची गोष्ट एकीकडे ठेविली तरी एकंदर दरसाल सरासरीने दहा लाख गुरांचा संहार होत आहे ! मि० मॅकनाक्टन यांनी संस्थानिक व आमचे सार्वभौम सरकार यांच्या राज्यपद्धतीची तुलना केली आहे. त्यांत ते ह्मणतात:-"संस्थानिक आपली बहुतेक कुरणे प्रजेस गरें चारण्याकरितां देतात आणि आम्ही ती विकतों. ते आपली पड जमान गायरान ह्मणून लोकांना फुकट देतात किंवा उगाच नांवाला त्यांजपासून काही पैसे घेतात, आणि आम्ही अशा जमिनीतील चान्याचे जास्त पैसे यावे झणन लिलांव करितो."