पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/45

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असावा असे दिसते. या संस्थांचे योग्य सुधारणांसह पुनरुज्जीवन होईल तर ते अत्यंत इष्ट आहे. असो. ठिकठिकाणच्या गोरक्षक मंडळ्यांस या संबंधांत आमची अशी विनंति आहे की, त्यांनी खाटकाच्या हातची गुरे सोडविण्यापेक्षां देशांतील जनावरें बळकट कशी करिता येतील या गोष्टीकडे विशेष लक्ष्य पुरवावें ह्मणजे त्यांचा हेतु जास्त सफल होईल. जमिनीवरचा सारा वाढल्यामुळे वैरण महाग झाली आणि ह्मणन गरें रोडावली, असे मि. मकनाक्टन ह्मणतात, याचाही विचार सरकारांत झाला पाहिजे. हा धान्याचा प्रश्न आम्ही सहाव्या कारणाच्या वेळी विचारांत घेणार असल्यामुळे येथे त्याविषयी विस्ताराने लिहिण्याचे कारण दिसत नाही. गुरासंबंधाने वर आलेच आहे. आतां राबासंबंधाने पाहूं गेले तरी जंगलचे नियमच आड येतात. झाडांचा विस्तार किंवा रानांतील कवळकाठी याच्याकडे नुसत्या वांकड्या नजरेने पाहिले की, आलेच तपकिरी रंगाचे गार्ड धांवत ! या जंगलच्यासंबंधी गुन्ह्याचे मान कसे वाढत चालले आहे, ते पाहिले झणजे बिचाऱ्या शेतकऱ्यांची स्थिति किती भयंकर झाली आहे, हे वाचकांच्या ध्यानात येईल! इ. स. १८८१-८२ साली या कायद्याखाली दोन हजार गुन्हे पकडले होते. ते पुढील दहा वर्षांच्या अखेरीस साडेचार हजार पकडण्यांत आले! " आई जेवू घालीना व बाप भिक्षा मागू देईना!" असा प्रकार आमच्या शेतकरी वगोचा झाला आहे. राबावांचून जमीनीत पीक निघत नाही आणि राब आणावा तर सरकारी शिपाई कोठडी दाखविल्यावांचून