पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/107

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०५)

वसाहतींसंबंधी राज्याचा आरंभ होय. स्पेन व पोर्तुगाल ह्या देशांच्या वसाहती बहुतेक त्या त्या देशच्या सरका रांकडून स्थापण्यांत आल्या होत्या; परंतु इंग्लंदच्या वसाहती खाजगी मनुष्यांनी स्थापिल्या होत्या. पहिला जेम्स व पहिला चार्लस हे राजे इंग्लंदचे राज्य करीत असतां अनेक कारणामुळे + नॉन्- कन्फॉर्मिस्टः व

  • रोमन क्याथलिक हे लोक इंग्लंद देश सोडून जाण्यास

तयार झाले; आणि ह्या देशांतर करण्यास तयार झाले- ल्या लोकांनीं व ÷ एस्टॅब्लिश्ड चर्चमधील कांहीं थोड्या साहसी लोकांनी अमेरिका खंडांत वसाहतींची एक मालिकाच स्थापिली. ह्या वसाहतींत स्वदेशापेक्षां आपणांस अधिक सुखार्ने राहतां येईल, असे त्यांस वाटलें. आरंभापासून ह्या वसाहती भिन्न भिन्न प्रकारच्या होत्या. व्हर्जिनिया ह्या वसाहतींतील राज्यसत्ता बडे लोकांच्या हाती असून तेथें × चर्च ऑफू इंग्लंद हा धर्मपंथ सुरू


+ दुसरा चार्लस राजा ह्यास पुन्हा राज्यपदावर बसविलें, त्या वेळी इंग्लंदांत नवीन स्थापन झालेल्या धर्माप्रमाणे चालण्याचें ज्यांनीं नाकारिलें, त्यांस 'नॉन्कन्फॉमिस्ट' असें नांव दिलें होतें.

 * स्प्रिंस्ती धर्माचे ३ पंथ आहेत: १ रोमन क्याथलिक, २ प्रोटेस्टंट व ३ ग्रीक.

 ÷ एस्टॅब्लिश्ड चर्च – सरकाराने स्थापन केलेला व ज्यास सरकारचा आश्रय आहे, असा धर्मपंथ.

 × चर्च ऑफ इंग्लंड - इ. स. १५३४त आठवा हेन्री त्यानें “ इंग्लंदचा श्रेष्ठ नायक" ( सुप्रीम हेड ऑफ दि चर्च