पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/109

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०७)

तेथेंहि गुलामांचा व्यापार होता; आणि न्यू इंग्लंद स्टेटस ही ÷ प्यूरिटन पंथाची असून तेथे गुलामांच्या व्यापा- रास प्रतिबंध होता.

ह्या वसाहती अतूलांतिक महासागराच्या पूर्व किना-यावर पसरल्या होत्या. न्यू आमस्तर्दाम- जिला हल्लीं न्यूयार्क म्हणतात–ती वसाहत वरील इंग्लिशांच्या वसाहतींच्या मध्यभागीं होती; व ती डच लोकांच्या ताब्यांत होती. तसेंच ह्या वसाहतींच्या दक्षिणेस स्पेन देशांतील लोकांची प्लारिडा ही वसाहत होती.आण- खीहि खालीं दक्षिणेस मिसिसिपी नदीच्या कांठचा प्रदेश; तसेच उत्तरेस एकेडी प्रांत व सेंट लारेन्स नदीच्या कांठचा प्रदेश हे होते. एकेडी प्रांताला हल्ली नोवा स्कोशिया म्हणतात; व सेंट लारेन्स नदीच्या कांठच्या प्रदेशाला कानडा म्हणतात, ह्या ३ वसाहती – मिसिसिपीच्या कांठचा प्रदेश, एकेडी प्रांत व सेंट लारेन्स नदीच्या कांठचा प्रदेश - - फ्रेंचांच्या ताब्यांत होत्या.इंग्लिशां- च्या प्रत्येक वसाहतीचें एक एक लहानसें पार्लमेंट होतें;


 ÷ प्युरिटन – एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत व ति च्यामागून लागलेच जे राजे गादीवर बसले त्यांच्या वेळीं एक नवीन धर्मपंथ उत्पन्न झाला. ईश्वराची स्तुति करण्याचा मार्ग अगदी पवित्र ( प्यूअर ) असावा, अशी त्या पंथांतील लोकांची इच्छा असे, म्हणून त्यांना प्यूरिटन म्हणत. १६४० पासून १६६० पर्यंत इंग्लंदाच्या इतिहासार्शी ह्यांचा पुष्कळ संबंध आलेला आहे. हे लोक आपले आयुष्य शांतपणानें व सद्गुणाने राहून घालवितात. अशी त्यांची आख्या आहे.