परंतु तिच्यावरील गव्हर्नराची नेमणूक इंग्लंदाहून होत
असे; व त्या वसाहतींना इंग्लंदाशी व्यापार करण्याची
मात्र मोकळीक असे. उत्तर अमेरिकेतील इंग्लिशांच्या
वसाहतींच्या आरंभाचा इतिहास ह्याप्रमाणें झाला.
ह्यावरून अर्से दिसून येईल कीं, क्रामवेल ह्याची
सत्ता इंग्लंदांत होती त्यावेळी म्हणजे १७व्या शत-
काच्या मध्याच्या सुमारास, अमेरिका खंड स्पेन, पोर्तु-
गाल, फ्रान्स, हार्लंड व इंग्लंद इतक्या युरोपांतील
राष्ट्रांच्या ताब्यांत होतें. ह्यांपैकीं स्पेन व पोर्तुगाल
ह्यांचे भाग मोठाले होते. उत्तर अमेरिकेंत फ्रान्सच्या
लढाई करून मिळविलेल्या वसाहती.
ताब्यांत बराच मुलूख होता; व वरील दोन
राष्ट्रांच्या खालोखाल फ्रान्साचेंच वर्चस्व तेथे
होतें. हालंद व इंग्लंद ह्यांच्या ताब्यांत त्या काळी
सर्वांत कमी प्रदेश होता. आतां तेव्हां अमेरिका खंडांत
हालंदच्या ताब्यांत फारच कमी मुलूख होता हें खरें;
परंतु एशिया खंडाच्या आग्नेय किनाऱ्यापासून बण्याच
अंतरावरील मसाल्यांच्या बेटांत व जावा बेटांत त्यांच्या
पुष्कळच वसाहती होत्या. बर्म्यूदा बेटांतील व उत्तर
अमेरिकेच्या किनाऱ्यावरील इतर लहानसान वसाहती
इतक्याच काय त्या इंग्लंदच्या ताब्यांत होत्या.अमे-
रिकेंतील मूळच्या रहिवाशांच्या ताब्यांतील प्रांत जिंक
ण्यांतच हा वेळपर्यंत वरील युरोप खंडांतील राष्ट्रांची च
ढाओढ सुरू होती. परंतु आलिव्हर कामवेल ह्याने