पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/112

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११०)

प्रयत्न त्यांनी चालविला होता. युरोप खंडांतील भिन्न भिन्न राष्ट्रांचा परस्परांशी चालणारा बहुतेक व्यापार त्या काळीं डच लोक करीत असत; एका राष्ट्रांतील बंदरी त्या राष्ट्रांत उप्तन्न होणारा माल ते विकत घेत; आणि दुसऱ्या राष्ट्रांतील बंदरी नेऊन तेथें अ- धिक किमतीस विकून नफा मिळवीत; इच लोकांबरोबर बसाहती संबंधानें युद्ध. अशा प्रकारची त्यांची व्यापाराची पद्धति होती. ह्या रीतीनें जलमार्गानें त्यांनी प्रचंड व्यापार सुरू केला हो- ता; व त्याच्या संरक्षण साठीं बलाढ्य आरमार ठेविलें होतें. हा डच लोकांचा व्यापार इंग्लिशांच्या डोळ्यांत सलत होता; म्हणून तो त्यांच्यापासून हिसकावण्याची इंग्लिशांना फार इच्छा झाली. डच लोकांचा व्यापार अग- दीं बुडविण्याच्या इराद्यानें गलते जाण्यायेण्यासं- बंधी कांहीं कायदे” (नव्हिगेशन आक्टस्) त्यांनी ठरविले. वसाहती व त्या ज्यांनीं स्थापिल्या असतील ते देश ह्यांमधील व्यापार कशा रीतीने चालावा, हे त्या कायद्यांत ठरविलें होतें; व म्हणन त्यांना फार महत्त्व आलें. कोण- ताहि माल ज्या देशांत तयार झाला असेल त्या देशच्या गलबतांतून किंवा इंग्लंदच्या गलबतांतून मात्र तो इंग्लं दास आणावा, असा त्या कायद्यांमुळे ठराव झाला. अर्थात् ह्यामुळे डच लोकांच्या व्यापाराला विल- क्षण धक्का बसला. तेव्हां ह्याबद्दल सूड उगविण्याची इच्छा त्यांना होणें साहजिकच होतें. म्हणून इंग्लंदांत