प्रजासत्ता ( x कॉमन - वेल्थ ) होती त्या वेळीं व दुसऱ्या
चार्लसच्या वेळी इंग्लिश व डच ह्या लोकां ध्यें नेहमीं
लढाया सुरू होत्या. तथापि डच लोकांची सत्ता हळू हळ
नष्ट होत चालली; व म्हणूनच न्यू आमस्तर्दाम (न्यूयार्क)
व सेंट हेलिना ह्या डच लोकांच्या दोन महत्त्वाच्या वसा-
हती इंग्लिशांना मिळाल्या. इंग्लिशांच्या नव्या वसाहती
व व्हर्जिनिया ह्यांच्यामध्ये न्यू आमस्तर्दाम ही वसाहत
होती. तसेच सेंट हेलिना ही वसाहत आफ्रिका खंडाच्या
दक्षिण किनाऱ्यावर बऱ्याच अंतरावर होतो. केप आफ
गुड होप इंग्लिशांनी घेतलें, त्यापूर्वी हिंदुस्थानास जाणा-
ज्या येणाऱ्या इंग्लिशांच्या गलबतांना मध्ये मुक्काम कर
ण्यास सेंट हेलिना ही वसाहत फार उपयोगी पडत असे.
डच लोांच्या वसाहतींशीं इंग्लिशांचा जो हा सामना
झाला, त्यामुळे त्यांचा एक मोठा शत्रु नाहींसा झाला.
ह्याप्रमाणें डच लोकांपासून उपद्रव होण्याची
x इंग्लंडचा राजा पहिला चार्लस हा हट्टी व खुनशी असून
पार्लमेंटाशी ह्याच नेहमीं भांडणे सुरू असत; व पार्लमेंटापासून
स्वतंत्र होण्याचा त्याने प्रयत्न केला होता. म्हणून पार्लमेंटानें.
त्याची चौकशी करून त्याला गुन्हेगार ठरवून १६४९ त त्याचा
शिरच्छेद केला. ह्यापुढे राजा मुळींच नाहीं, सर्व सत्ता प्रजेची,
असे पार्लमेंटाने ठरविलें, व काम चालविण्यासाठी मंत्रिमंडळ
[ कौन्सिल ] नेमिलें. ब्राडशा हा ह्या मंत्रिमंडळाचा अध्यक्ष होता.
परंतु वास्तविकपणे सर्व सत्ता कामवेल ह्याच्या हाती होती. अशी
स्थिति १६४९-१६६० चालली होती; म्हणजे ह्या मुदतींत इंग्लं-
दच्या गादीवर राजा मुळींच नव्हता. ह्या व्यवस्थेला " कॉमन-
वेस्थ "म्हणतात.