पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/120

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११८)

राष्ट्राचे कर्ज ही वसाइती ज्यांना म्हणतात त्यामध्ये एका मिळविण्यास पडलेली किंमत होय. बाजूज़ फार मोठ्या ठश्यांनी गळ्या शाईनें राष्ट्रांचे कर्ज दाखविलेले असते; व दुसऱ्या बाजूस अति लहान ठश्यांनी तांबड्या शाईनं राष्ट्राचें वैभव दाखविलेले असत ( सारांश, कर्जाचा मोठा बाऊ करून दाखविलेला असतो, व त्या कर्जामुळे जो अति मोठा फायदा होत असतो तो कांहींच नाहीं, असे दाख- विण्याचा प्रयत्न असतो. ) इंग्लिशांच्या पूर्वजांनी युद्धे वगैरे करण्यांत जे द्रव्य खर्चिलें त्याचा वर लिहिल्याप्र- माणे त्यांचेच वंशज सांप्रत त्यांच्या वतीनें जमाखर्च दाखवितात. आपल्या पूर्वजांनी लढाया करून इतकें वैभव आपणांसाठीं संपादून ठेविलें, ह्याचद्दल हल्ली इंग्लि- शांनीं वास्तविक त्यांचा गौरव केला पाहिजे; परंतु असे न करितां उलट हे वैभव संपादण्यासाठी त्यांनी केलेल्या खर्चाचा ते मोठा बाऊ करून दाखवितात, हे योग्य नाहीं.

 समजा, एक भांडवलवाला एका खाणीचे काम चाल- वीत आहे; ह्या कामांत प्रतिवर्षी तो पुष्कळ पैसा घालीत आहे; वारंवार पैसा कर्जी काढूनहि तो त्या धंद्यांत घा- लीत आहे; ती खाण फार भयंकर प्रकारची असल्या- मुळे मोठाले अपघात होण्याची तेथे फार भीति आहे; तसेच वारंवार ह्याप्रमाणे भयंकर अपघात घडलेलेहि आ- हेत. अशी एवंदर स्थिति असतांहि कोणीं येऊन सांगितले की, ह्या एकंदर धंद्यापासून त्या भांडवलवाल्याला