पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/121

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११९)

फारच नफा झाला, तर काय वाटणे साहजिक आहे बरें ? अर्थात् तर्से सांगणारा तेव्हांच वेडा ठरेल, व त्या- ला ताबडतोब वेड्यांच्या दवाखान्यांत पाठविले पाहिजे, असे सर्वांस वाटेल. इंग्लिशांचे आजे पणजे म्हणजे ह्याप्र- मार्णे मुर्ख होते, असे मानण्यास आधार नाहीं; व तसे सिद्धहि करून दाखवितां येईल.

 आतां दुसरे एक उदाहरण घेऊं. इंग्लिशांच्या वसाहतींपैकी एका वसाहतींतील एका मनुष्यानें तेथील सरकारापासून मेंढ्या चारण्याचें एक कुरण भाड्यानें घे- तलें. हें कुरण उत्तम प्रकारचें होतें; व त्यापासून त्याला मोठा नफा झाला. इतक्यांत त्या ठिकाणच्या कायद्यांत फेरफार झाला; आणि त्याला व तेथील इतर लोकांना कांहीं नियमित आकारापर्यंत मजींस वाटेल ती जर्मान फुकट घेण्याची परवानगी मिळाली, आतां त्या गृहस्थानें आपलें जें कुरण होतें त्यापैकी जितका भाग कायद्यानें घेण्यासारखा होता तितका पसंत करून त्यानें तो घेतला ह्यांत कांहीं विशेष नाहीं, परंतु इतर लोकांना त्याच्या नफा नुकसानीशी कांहीं करावयाचें नसल्यामुळे त्या कु- रणापैकीं राहिलेले तुकडे त्यांनी पसंत करून घेतले; व ते तुकडे आपण घेतले असतां त्यानें घेतलेल्या तुकड्यास त्यांपासून फार नुकसान होईल असे समजून उमजून त्यांनी तसे केलें. ह्याप्रमाणे त्याच्या जमिनीचे तुकडे झाल्यामुळे तिची नासाडी झाली. त्याचें कुटुंब तर मोठें