पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/145

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४३)

तात कीं, वसाहती ह्या लहान मुलांप्रमाणे आहेत. लहा- नपणी आई मुलांवर देखरेख ठेविते, त्यांचे संरक्षण करिते, आणि त्यांना शिक्षण देऊन चांगल्या मार्गास लाविते. परंतु मुले जसजशी मोठी होत जातात, तसतशीं ती स्वतःचें संरक्षण करावयास शिकतात; आणि जरी ती परस्परांशी भांडत नसली, तरी देखील कांही काळानें त्यांच्या परस्परांमध्ये व आईमध्ये नात्याचा संबंध फारसा राहत नाहीं; राहिलाच तर फारच सूक्ष्म राहतो.

 आतां मूळ देश व त्यांच्या वसाहती ह्यांजमधील संबंध ध्यानांत आणण्यास वरील दोन सादृश्यांपैकी एकहि प्रस्तुत काळीं लागू पडतेंसें वाटत नाहीं. वृक्षांच्या साह- श्यावरून असे दिसतें कीं, त्याला प्रारंभी जे फळ आले, तसली फळें प्रतिवर्षी उत्पन्न करण्याची शक्ति निदान कांही वर्षे तरी त्या वृक्षाच्या खोडाच्या आंगी आहे; व ह्या प्रतिवर्षी उत्पन्न होणाऱ्या फळांच्या आंगींहि आणखी नवीन फळें उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहेच. भृमंडळाच्या पृष्ठभागावर अनेक वसाहती करण्यासारखी जागा जोपर्यंत शिल्लक होती, तोपर्यंत हे सादृश्य फार चांगलें लागू पडले असते; परंतु युरोपियन लोकांना वसा- हती करितां येण्यासारखा सूमंडळाचा बहुतेक सर्व पृष्ठ- भाग त्यांनीं, त्यांच्या वसाहतींनीं, किंवा चिनी लोकां- सारख्या लोकांनी व्यापून टाकिला आहे, अशी हल्लीं बची पक्की खातरी आहे; म्हणून प्रस्तुतच्या स्थितीस