गोष्ट थोडीशी लागू पडते; पण हे लोक राजकीय संबं
'वावरून हा देश सोडून जातात ते कांहीं ब्रिटिश वसा-
हतींत जात नाहींत; तर युनायतेद स्तेत्समध्ये जातात.
लष्करी ठिकाणें बनविणें हा वसाहती
स्थापण्याचा तिसरा उपयोग होय. रोमन लोकांनी आप-
ल्या बहुतेक वसाहती ह्याच उद्देशानें
लष्करी कामाकडे
त्यांचा उपयोग.
स्थापिल्या होत्या. आपल्या विरुद्ध असणाऱ्या लोकांवर
आपला अंमल बसविण्यासाठी किंवा राष्ट्राचें मुख्य स्थान
( रोम ) व लांब लांबचे प्रदेश ह्यांचा संबंध कायम
राखण्यासाठी त्यांनी ह्या लष्करी वसाहती मधून मधून
स्थापिल्या होत्या. ह्या दोन उपयोगांपैकी पहिला-आप-
ल्याविरुद्ध असणाऱ्या लोकांवर आपला अंमल बसवि
ण्याकडे होणारा-उपयोग ब्रिटिश वसाहतींपासून त्यांना
हल्ली होत नाहीं.
लांब लांबच्या ठिकाणांशी संबंध राखणे हा ह्या
लष्करी वसाहतींचा दुसरा उपयोग. अशा प्रकारचीं
इंग्लिशांचीं फारशीं ठिकाणें नाहींत; जिब्राल्टर व माल्टा
ह्रीं अशा प्रकारची आहेत. ह्यांच्या योगानें ज्या वसाह
तींशीं किंवा ताव्यांतील देशांशी इंग्लिशांचें दळण वळण
चाल राहतें, त्या वसाहतींच्या अगर देशांच्या महत्त्वा-
वर ह्यांचे महत्त्व अवलंबून आहे, हे उघड आहे. म्हणून
त्या वसाहती व ते देश ताब्यांत राखणे जर फायदेशीर
असेल तर त्यांच्यांशी हे दळण वळण ज्या लष्करी