पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/35

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ३३ )

  अशा आणीबाणीच्या वेळी इंग्लिश व्यापाऱ्यांच्या सुदैवाने त्यांच्या कारकुनांतच अमानुष सामर्थ्याचा, लष्करी कामांत अति विलक्षण बुद्धीचा, व नेटिव्हांची खोड त्यांच्याच हातून मोडविण्यास समर्थ, असा एक मनुष्य निघाला. हा मनुष्य राबर्ट क्लाईव्ह होय. हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्याचा पाया घालणारा हाच मनुष्य, असें म्हणण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. आपल्या शिपायांची चांगली व्यवस्था करून त्यांचें त्यानें एक युरोपियन पद्धतीचे सैन्य उभारिले; आणि फ्रेंच व नेटिव्ह ह्यांनीं हल्ले केले तेव्हां त्यांची पीछेहाट केली.
प्लासीची लढाई
 भांडण येथवर येऊन ठेपलें तेव्हां दोन लढाया लक्षांत ठेवण्यासारख्या झाल्या. १ली लढाई प्लासीची; ही इ. स. १७५७त झाली. ह्या लढाईत खुद्द क्लाईव्ह साहेबानें १ हजार इंग्लिश शिपाई व ३ हजार नेटिव्ह शिपाई इतक्या सैन्यानिशीं बंगालच्या नबाबाच्या किमानपक्ष २० हजार सैन्याचा अगदीं पराभव केला. बंगालच्या नबाबाने फ्रेंचांच्या जोरावर गंगा नदीवरील इंग्लिशांच्या ठिकाणांवर हल्ला करून तीं घेतलीं होती; आणि कंपनीच्या नौकरांपैकीं बहुतेकांस कलकत्याच्या प्रसिद्ध अंधार कोठडीमध्यें ( ब्लाक होलमध्यें ) टाकिलें होतें. ह्या प्लासीच्या लढाईवरून असें दिसून आलें कीं, इंग्लिश व त्यांचे कवायत शिकलेले नेटिव्ह शिपाई हे हिंदुस्थानातील